31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeराजकीयवाढदिवसानिमित्त ऑनलाईन शुभेच्छा द्या : जयंत पाटील

वाढदिवसानिमित्त ऑनलाईन शुभेच्छा द्या : जयंत पाटील

टीम लय भारी  

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची वयाची 81 वर्षे पूर्ण होत आहे. पण कोरोनाच्या ओमियोक्राँन या व्हेरियंन्टमुळं जगभरात वातावरण आहे, तसेच कोरोनाची वाढते रुग्णसंख्या लक्षात घेता, वाढदिवसानिमित्त भेटायला येऊ नका असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे(Jayant Patil’s appeal, give birthday wishes online).

कोरोना असल्यामुळे शरद पवार ‘व्हर्च्युअल रॅली’च्या माध्यमातून शुभेच्छा स्वीकारणार आणि संवाद साधणार आहेत. १२ डिसेंबर रोजी त्यांना भेटण्यासाठी कुणीही येऊ नये, असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे.वाढदिवसानिमित्त व्हर्च्युअल रॅली पक्षाच्या अधिकृत फेसबुक पेज व युट्यूब चॅनेलवर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.

समीर वानखेडेंची चौकशी करणारी टीम चुकांवर पांघरून घालणारी नसावी, जयंत पाटलांचा खोचक टोला

निवडणूक कशी जिंकायची?; जयंत पाटलांनी दिला कानमंत्र!

 व्हर्च्युअल रॅली कोरोना नियमांचे पालन करून ही मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत रविवार 12 डिसेंबर रोजी नेहरु सेंटर वरळी येथे सकाळी 11 ते 1 या वेळेत पार पडणार आहे.  शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही दरवर्षी पक्षाच्यावतीने नवीन उपक्रमाची घोषणा करत असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

कोरोनाचे संकट लक्षात घेता आपण नियामावलीचं पालन केले पाहिजे म्हणून राष्टवादी काँग्रेसने हा निर्णय घेतला आहे.  पक्ष संघटना व कार्यकर्ते यांच्यातील समन्वय अधिक सक्षम होण्याकरिता एका महत्वाच्या अ‍ॅपचे उद्घाटन होणार असून विद्यार्थी संघटनेला ‘महाराष्ट्र युथ कार्निव्हल’ असा आगामी काळाकरिता विशिष्ट कार्यक्रम देण्यात येणार आहे.

जाणून घ्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीतला एकूण खर्च आणि शिल्लक

Amid Omicron scare, NCP to mark Pawar’s 81st birthday with virtual rally

14 ते 20 डिसेंबर या कालावधीत विविध सप्ताहाचे आयोजन करण्यात आले यामध्ये पक्षाची फादर बॉडी, फ्रंटल व सेलच्या विभागामार्फत सभासद नोंदणी कार्यक्रम, आरोग्य, रक्तदान शिबीर, औषध वाटप, वृक्ष लागवड, पर्यावरण विषयक कार्यक्रम, याशिवाय कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन  कोरोना लस घेण्याबाबत जनजागृती व इतर समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी