28 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमुंबईजेट एअरवेज पुन्हा घेणार भरारी

जेट एअरवेज पुन्हा घेणार भरारी

टीम लय भारी

मुंबई : तीन वर्षांनंतर जेट एअरवेज आता पुन्हा एकदा लोकांच्या सेवेत दाखल होणार आहे. २०१९ मध्ये जेट एअरवेज डबघाईला गेल्यानंतर पुन्हा एकदा आता जेट एअरवेज भरारी घेणार आहे. कंपनीने शुक्रवारी ट्विटरच्या माध्यमातून याबाबतची माहिती दिली आहे. पुन्हा नव्याने जेट एअरवेज सुरु होत असल्याने कंपनीने त्यांच्या जुन्या कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यास सांगितले आहे.

२०१९ मध्ये जेट एअरवेज ही कंपनी बुडीस गेली होती. वाढत्या तोट्यामुळे ही हवाई कंपनी बंद करण्याचा निणय घेण्यास आला होता. त्यानंतर गेल्या २ वर्षांपासून ही कंपनी पुन्हा सुरु करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण आता जेट एअरवेजचे नवे मालक मुरारी लाल जलान यांनी हवाई वाहतूक संचालनालयाकडून सर्व परवानग्या घेतल्या आहेत. २० मे रोजी हवाई वाहतूक संचालनालयाकडून जेट एअरवेजला पुन्हा सेवा सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

जुलै ते सप्टेंबर या महिन्यात जेट एअरवेज लोकांसाठी आपली सेवा सुरु करण्याची शक्यता आहे. यावेळी जेट एअरवेजने आपल्या जुन्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू होण्यास सांगितले असले तरी, कंपनीकडून महिला केबिन क्रू मेंबर्सला प्राधान्य देण्यात आले आहे. महिला केबिन क्रू मेंबर्सनी पुन्हा एकदा जेट एअरवेजसोबत कामासाठी यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. काही दिवसांत पुरुष केबिन क्रू मेंबर्सला कामावर रुजू करून घेण्यात येईल, असेही जेट एअरवेजकडून सांगण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा :

शिवसेनेचा मोठा निर्णय; बंडखोरांना बाळासाहेबांचे नाव वापरता येणार नाही, त्यांनी बापाचे नावाने मते मागावीत

‘आमदारांना अधिकाऱ्यांच्या बदल्यांतून मलिदा मिळाला नाही म्हणून ते फुटले’

महाराष्ट्रातील तरुणांना शासकीय सेवेत दाखल होण्याची सुवर्णसंधी !

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी