राजकीय

बहुजनवाद विरुद्ध मनूवाद : आमदार जितेंद्र आव्हाड

आज कोल्हापूरमध्ये शाहुंच्या विचारांवरती जागर करायला गेलो होतो. सहज आठवलं कि सनातन आणि मनुवाद्यांनी असच शाहू महाराजांना घेरलं होतं. त्यांच्या बदनामीच मोठं षडयंत्र आखलं होतं. पण अशांना घाबरून शाहू महाराज थांबतील तर ते शाहू महाराज कसले.

टीम लय भारी

बहुजनवाद विरुद्ध मनूवाद : आमदार जितेंद्र आव्हाड

मुंबई : आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra awhad) एका कार्यक्रमासाठी कोल्हापुरात गेले होते. त्यांनी ‘बहुजनवाद विरुद्ध मनूवाद’ या मथळ्याखाली सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर केली आहे. आव्हाड यांनी शाहू महाराज आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची तुलना केलीय.

आज कोल्हापूरमध्ये शाहुंच्या विचारांवरती जागर करायला गेलो होतो. सहज आठवलं कि सनातन आणि मनुवाद्यांनी असच शाहू महाराजांना घेरलं होतं. त्यांच्या बदनामीच मोठं षडयंत्र आखलं होतं. पण अशांना घाबरून शाहू महाराज थांबतील तर ते शाहू महाराज कसले.

ह्या सगळ्यांना लाथाडून त्यांनी आपले विचार लोकांच्या मनामनात पोहचवले. त्यांना थांबविण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले. आणि ते सनातनी आजही कोणाच्या लक्षात नाहीत. पण शाहू महाराज आणि त्यांचे विचार हे संपूर्ण देशात घराघरात आहेत.

असंच काहीसे शरद पवार साहेबांच्या बाबतीत घडतयं. चहुबाजूनी त्यांना घेरण्याचा प्रयत्न सनातनी आणि मनुवादी करीत आहेत. एका चक्रव्यूहात अडकून त्यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण अशांना घाबरून शरद पवार साहेब थांबतील तर ते शरद पवार साहेब कसले. जेव्हा जेव्हा बहुजनवादी विरुद्ध सनातनवादी युद्ध होते. तेव्हा तेव्हा हे सगळं घडतच राहत. आणि काळ त्याला साक्षीदार आहे.

आमदार जितेंद्र आव्हाड यांची ही पोस्ट सोशल मिडीयावर चर्चैेत आहे. मागील काही दिवसांपासून शरद पवार यांच्यावर अनेक नेत्यांनी टीका केली होती. त्यामुळे आमदार  जितेंद्र आव्हाड यांनी ही पोस्ट लिहिली होती. बहुजनवाद विरुद्ध मनूवाद : आमदार जितेंद्र आव्हाड

 

हे सुद्धा वाचा: 

जे लोक द्वेषाने बोलतात त्यांना अहिल्यादेवींचा विचारच कळला नाही : रोहित पवार

In Yogi Adityanath Ayodhya Visit Tomorrow, A Big Milestone For Ram Temple

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close