27 C
Mumbai
Thursday, March 16, 2023
घरनोकरीएमपीएससीच्या जाहिरातीत ऑनलाईन त्रुटी, पदवीधरांचा जीव टांगणीला, नेमकं प्रकरण काय?

एमपीएससीच्या जाहिरातीत ऑनलाईन त्रुटी, पदवीधरांचा जीव टांगणीला, नेमकं प्रकरण काय?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने माहिती व जनसंपर्क विभागात ऑनलाईन प्रक्रियेत तांत्रिक त्रुटी असल्याने पत्रकारितेची पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेल्या उमेदवारांचे अर्ज स्विकारले जात नसल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात छगन भुजबळ यांनी शासनाला पत्र पाठविले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे आजवरच्या इतिहासातील सर्वांत मोठी पदभरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ची जाहिरात एमपीएससीने शुक्रवारी प्रसिद्ध केली. मात्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) वतीने माहिती व जनसंपर्क विभागात (Information and Public Relations Department) ऑनलाईन प्रक्रियेत तांत्रिक त्रुटी असल्याने पत्रकारितेची पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेल्या उमेदवारांचे अर्ज स्विकारले जात नसल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे अनेक पत्रकारिता पदव्युत्तर पदवीधारकांचा जीव टांगणीला लागला आहे. यासंदर्भात छगन भुजबळ यांनी शासनाला पत्र पाठविले आहे.

एमपीएससीच्या प्रसिद्ध जाहिरातीनुसार गट ब आणि गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 ही परीक्षा 30 एप्रिलला होणार आहे. राज्यातील एकूण ३७ जिल्हा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येईल. तर गट ब सेवा मुख्य परीक्षा मुख्य परीक्षा २०२३ ही परीक्षा २ सप्टेंबरला, तर गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 ही परीक्षा 9 सप्टेंबरला घेण्यात येणार आहे. आतापर्यंत दोन हजार पदांपेक्षा जास्त पदांची जाहिरात एमपीएससीने प्रसिद्ध केली नव्हती. त्यामुळे पहिल्यांदाच आठ हजार पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्याशिवाय देशाच्या प्रशासकीय इतिहासातही एवढ्या पदांची भरती लोकसेवा आयोगामार्फत राबवली जाणे दुर्मीळ आहे. एकाच अर्जाद्वारे विविध पदांच्या भरती प्रक्रियेत उमेदवारांना सहभागी होण्याची संधी उपलब्ध होत आहे, अशी माहीती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सहसचिव सुनील अवताडे यांनी दिली आहे.

या भरती प्रक्रियेतील जाहिरातीत स्पष्टपणे पत्रकारितेतील पदवी नमूद केले असतांनाही उमेदवार जेव्हा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी जातो, तेव्हा त्याला ‘आपल्याकडे सदर पदांसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता नसल्यामुळे अर्ज करण्यास पात्र नाहीत’ असा संदेश येतो. त्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करता येत नाही. पत्रकारितेची बॅचलर व डिप्लोमा ही डिग्री घेतलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येत आहे. मात्र पत्रकारिता व जनसंपर्क विषयात ख्यातनाम विद्यापीठातून कला पारंगत पदवी (पदव्युत्तर पदवी) घेतलेले विद्यार्थी अपात्र ठरत असल्याचे पत्र छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शासनांस पाठविले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उपसंचालक, जिल्हा माहिती अधिकारी व माहिती अधिकारी या पदांसाठी जम्बो भरतीची जाहिरात प्रसिध्द केली आहे. या जाहिरातीसाठी पत्रकारिता व जनसंपर्क क्षेत्रातील उच्च शैक्षणिक अर्हता असतांनाही उमेदवारांचे ऑनलाईन अर्जासाठी अपात्र असल्याचे संदेश येत आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या हेल्पलाईनच्या माध्यमातून उमेदवारांना समाधानकारक उत्तर मिळत नसल्यामुळे राज्यातील लाखो पत्रकारिता पदव्युत्तर पदवीधारकांचा जीव टांगणीला लागला आहे. कधी नव्हे अनेक वर्षापासून उपलब्ध झालेली संधी एमपीएससीच्या चुकीच्या ऑनलाईन प्रक्रीयेमुळे गमाविण्याची भीती तरूणांमध्ये निर्माण झाली असल्याचे म्हटले आहे. याबाबत तातडीने तांत्रिक तृटी दूर करून पदव्युत्तर पदवी धारकांचे अर्ज स्वीकारण्यात येऊन अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

हे सुद्धा वाचा : MPSC Students : एमपीएससी विद्यार्थ्यांचे सरकारविरोधात अनोखे आंदोलन

मुदत वाढविण्यात यावी…आपल्या यापूर्वीच्या जाहिरातीत पदांसाठी सुरूवातीस ऑनलाईन अर्ज भरतांना पत्रकारितेची पदव्युत्तर पदवी धारकांना अडचणी आल्या होत्या. कालातरांने त्यात दुरूस्ती करण्यात येऊन अर्ज स्विकारले गेले होते. तेव्हा सध्याच्या जाहिरात क्र.129, 130 व 131 च्या माध्यमातून ही पत्रकारितेच्या पदव्युत्तर पदवीधारकांना ऑनलाईन अर्ज करतांना मुदत संपण्याच्या आत तात्काळ दिलासा देण्यात यावा. तसेच या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत ही वाढविण्यात यावी अशी मागणी छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

या भरती प्रक्रियेत सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, दुय्यम निबंधक, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, तांत्रिक सहायक, कर सहायक, लिपीक-टंकलेखक अशा एकूण 8 हजार 169 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे एमपीएससीने स्पष्ट केले आहे.

‘या’ विभागांमध्ये होणार 8 हजार 169 पदांची भरती
● सामान्य प्रशासन विभाग – सहायक कक्ष अधिकारी – 70 पदे

● महाराष्ट्र लोकसेवा आयोग- सहायक कक्ष अधिकारी – 8 पदे

● वित्त विभाग – राज्य कर निरीक्षक – 159 पदे

● गृह विभाग- पोलीस उपनिरीक्षक – 374 पदे

● महसूल व वन विभाग – दुय्यम निबंधक (श्रेणी -1)/मुद्रांक निरीक्षक – 49 पदे

● गृह विभाग- दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क – 6 पदे

● वित्त विभाग – तांत्रिक सहायक – 1 पद

● वित्त विभाग – कर सहायक –468 पदे

● मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालये – लिपिक टंकलेखक – 7034 पदे

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी