29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्र'लय भारी' कार्यालयाचा उद्घाटन सोहळा

‘लय भारी’ कार्यालयाचा उद्घाटन सोहळा

टीम लय भारी

मुंबई : ‘लय भारी’ खमकी भूमिका, खणखणीत आवाज! असे म्हणत गुरुवारी ( १२ ऑगस्ट) ‘लय भारी’ या न्यूज पोर्टलच्या कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. दुपारी १ वाजता कोरोना निर्बंधामुळे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत मुंबईतील फोर्ट परिसरात ‘लय भारी’ कार्यालयाचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी मंत्री थोरात आणि मंत्री मुंडे यांनी ‘लय भारी’ चे संपादक तुषार खरात  व त्यांच्या संपूर्ण टीमला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.  ‘लय भारी’ न्यूज पोर्टलने सामान्य माणसांचे प्रश्न मांडत आपले काम तळागाळात पोहचवावे अशी अपेक्षांसह भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा  दिल्या. (Laybhari office inauguration ceremony)

आत्तापर्यंत ‘लय भारी’चे नाव ऐकले की लोक रितेश देशमुख याच्या चित्रपटातील वीट हातात घेतल्याचे चित्र डोळ्यासमोर उभे रहाते. परंतू आता ‘लय भारी’ म्हटले की, तुषार खरातचा चेहरा समोर येतो, अशा शब्दांत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी  ‘लय भारी’ टीमचे कौतुक केले.

‘लय भारी’ भविष्यात महाराष्ट्रात दबदबा तयार करेल : बाळासाहेब थोरात

पुणे जिल्ह्यातल्या एका गावात तीन महिने गर्भधारणा न करण्याचा प्रशासनाकडून सल्ला

'लय भारी' कार्यालयाचा उद्घाटन सोहळा
बाळासाहेब थोरात आणि धनंजय मुंडे

लय भारी वेब पोर्टलने अल्पावधीतच महाराष्ट्राभर आपले नाव कमावले आहे. खमकी भूमिका घेत आपल्या अनेक बातम्यांनी ‘लय भारी’ ने स्वःताची एक वेगळी ओळख पत्रकारिता जगतात निर्माण केल्याचे दोन्ही पाहुण्यांनी कौतूक केले (laybhari has created a distinct identity in the world of journalism).

पुणे जिल्ह्यातल्या एका गावात तीन महिने गर्भधारणा न करण्याचा प्रशासनाकडून सल्ला

Twitter locks Congress party’s official handle

‘लय भारी’ न्यूज पोर्टलचा प्रवास गेल्या दीड वर्षांपासून सुरू झाला आहे. एवढ्या कमी वेळेतच लय भारीने आपला दबदबा स्वतःच्या वाचक वर्गात निर्माण केला. तसेच ‘लय भारी’ न्यूज पोर्टल सोशल मीडियावर सुद्धा नेहमी अपडेट असतो (laybhari news portal is also always updated on social media).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी