30 C
Mumbai
Monday, May 13, 2024
Homeआरोग्यदिलासा! महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा समूह संसर्ग नाही; बूस्टर डोसबाबत पुढच्या आठवड्यात निर्णय

दिलासा! महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा समूह संसर्ग नाही; बूस्टर डोसबाबत पुढच्या आठवड्यात निर्णय

टीम लय भारी

मुंबईः राज्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी. महाराष्ट्रात ओमिक्रॉनच्या कोरोना विषाणूचा समूह संसर्ग अजून तरी झालेला नसल्याचे उघड झाले आहे. जिनोमिक सिक्वेंसिंगच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. राज्यातील सर्व वयोगटातील करोना बाधितांचे घेतलेले नमुने दिल्लीला पाठवण्यात आले होते. आता त्याचा अहवाल समोर आला आहे.( Maharashtra, No group infection of Omicron)

अजून डेल्टाचाच समूह

जिनोमिक सिक्वेंसिंगच्या अहवालात म्हटले आहे की, राज्यात अजून तरी ओमिक्रॉनचा समूह संसर्ग झालेला नाही. आजपर्यंत केलेल्या सर्वेक्षणावरून राज्यात डेल्टाचाच समूह संसर्ग असल्याचे पुढे आले आहे. पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजकडे देण्यात राज्य समन्वयाची जबाबदारी आहे. त्यानुसार राज्यातील सर्व वयोगटातील कोरोनाबाधितांच्या घेतलेले नमुने दिल्लीला पाठवण्यात आले होते. त्यातूनच ही माहिती समोर आली आहे. राज्य सरकारने दिल्लीच्या इन्स्टिट्यूट ऑफ जिनोमिक अँण्ड इंटीग्रेटीव्ह बायोलॉजी या संस्थेसोबत जीनोम सिक्वेंसिगंच्या अहवाल देण्याबाबत करार केला आहे. आता या इन्स्टिट्यूटने दिलेल्या अहवालात राज्यात ओमिक्रॉनचा समूह संसर्ग सुरू झाला नसल्याचे स्पष्टीकरण दिल्यामुळे महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबई महापालिका Omicron ला रोखण्यासाठी सज्ज; महापौरांनी मुंबईकरांना केलं आवाहन,म्हणाल्या…

31 डिसेंबरपर्यंत राज्यात नवी नियमावली लागू

दिल्लीत आज बैठक

देशातल्या 17 राज्यांमध्ये ओमिक्रॉन संक्रमित झाल्यामुळे आज केंद्र सरकारने महत्त्वाची बैठक बोलावली आहे. महाराष्ट्र आणि नवी दिल्लीत सर्वात जास्त ओमीक्रॉनचे रुग्ण सापडले असून, देशातील ओमिक्रॉन रुग्णांची संख्या ही 236 वर पोहोचली आहे. दरम्यान दिल्ली सरकारने नववर्षांच्या पार्टी आणि सेलिब्रेशन वर बंदी घातली असून, अरविंद केजरीवाल यांनीही आज एक बैठक बोलावली आहे.

बूस्टर डोसवरही चर्चा

देशात ओमिक्रॉन धोका वाढत असतानाच बूस्टर डोसबाबत पुढच्या आठवड्यात निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. सध्या पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत कोविशील्ड आणि कोवॅक्सिन या लसींचा ओमिक्रॉनवर कितपत परिणाम होतोय, याबाबतचा अभ्यास सुरू असून भारतीयांना बुस्टर डोस द्यायचा की नाही याचा निर्णय पुढच्या आठवड्यात घेतला जाणार आहे.

महाराष्ट्रातील शाळा पुन्हा बंद होणार?

Mumbai News Live: Mumbai logs 490 new Covid-19 cases; Schools might be shut again, says Maharashtra minister

ब्रिटन लॉकडाऊनकडे

ब्रिटनमध्ये गेल्या चोवीस तासांमध्ये कोरोनाचा कहर दिसून आलाय. 1 लाख 47 हजार कोरोनाचे नवे रुग्ण ब्रिटनमध्ये आढळून आलेत.त्यामुळं ब्रिटन सरकारची चिंता वाढली आहे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी आज एक तातडीची बैठक बोलावली असून ब्रिटनमध्ये लॉकडाउनची घोषणा होण्याची शक्यता आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी