32 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeराजकीयओबीसींसाठी वंचितची विधानभवनावर धडक, कार्यकर्त्यांची धरपकड

ओबीसींसाठी वंचितची विधानभवनावर धडक, कार्यकर्त्यांची धरपकड

टीम लय भारी

मुंबई : ओबीसींच्या आरक्षणासाठी आज वंचित बहुजन आघाडीने विधानभवनासमोर जोरदार आंदोलन केलं. वंचितच्या आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण विधानभवन परिसर दणाणून सोडला. प्रचंड संख्येने आंदोलक जमल्याने त्यांची धरपकड करण्यात आली. त्यामुळे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरही संतापले आहेत. आता हे आंदोलन आम्ही गावपातळीपर्यंत घेऊन जाऊ असं प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलं(Vanchit Bahujan Aghadi hits Vidhan Bhavan for OBCs).

प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात आज विधानभवनावर वंचितच्या शेकडो कार्यकर्त्यांनी धडक दिली. ओबीसींना आरक्षण मिळालच पाहिजे, अशी मागणी करतच हे आंदोलक विधानभवन परिसरात धडकले. अचानक शेकडो कार्यकर्ते आल्याने पोलिसांचीही तारांबळ उडाली. पोलिसांनी जमाव पांगवायला सुरुवात केली. तसा जमाव अधिक आक्रमक झाला. आंदोलक अधिकच आक्रमक होत असल्याचं पाहून पोलिसांनी आधी प्रकाश आंबेडकरांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. पोलीस आणि आंबेडकरांची चर्चा सुरू असतानाच इकडे आंदोलकांच्या जोरजोरात घोषणाही सुरू होत्या. त्यामुळे पोलिसांनी या आंदोलकांची तात्काळ धरपकड करण्यास सुरुवात केली.

प्रकाश आंबेडकर यांची पुन्हा दमदार एंट्री

ओबीसीचा डेटा गोळा करण्यासाठी ४३५ कोटींची तरतूद

गावपातळीपर्यंत ओबीसींचा लढा नेणार

यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षणावरून केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. या दोन्ही सरकारांना ओबीसींना आरक्षणच द्यायचं नाहीये, असा दावा आंबेडकर यांनी केला. मंडल आयोगापेक्षाही आता मोठी लढाई असणार आहे. आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही. राज्यभर हे आंदोलन घेऊन जाऊ. तालुका आणि गावपातळीपर्यंत ही लढाई लढली जाईल, असं आंबेडकर म्हणाले. ओबीसींना राजकीय आरक्षण मिळालंच पाहिजे. ओबीसींची जातीनिहाय जनगणना केलीच पाहिजे. एकदा जनगणना केली तर राजकीय आरक्षणही आपोआप मिळेल, असं ते म्हणाले. या सरकारने केवळ ओबीसीच नव्हे तर मराठा आरक्षणाचंही वाटोळं केलं आहे. गरीब मराठ्यांना वाऱ्यावर सोडण्याचं काम या सरकारने केलं आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.

पंतप्रधान मोदींची नक्कल केल्याबद्दल शिवसेना आमदाराने मागितली माफी

Vanchit Bahujan Aghadi to contest 80-90 seats in the BMC election

144 कलम लावण्यात आलं?

दरम्यान, वंचितच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विधान भवन परिसरात 144 कलम लागू करण्यात आलं आहे. त्यालाही आंबेडकरांनी आक्षेप घेतला. कशाच्या पार्श्वभूमीवर 144 कलम लावण्यात आलं? असा सवाल त्यांनी केला. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी आहेत. ते बरे झाल्यानंतर त्यांची भेट घेऊन ओबीसी आरक्षणावर चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी