29.5 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeटॉप न्यूजCorona Updates : केंद्राचे घुमजाव! १२ ते १४ वयोगटातील मुलांना लस देण्याचा...

Corona Updates : केंद्राचे घुमजाव! १२ ते १४ वयोगटातील मुलांना लस देण्याचा कोणताही कार्यक्रम अद्याप ठरलेला नाही

टीम लय भारी

नवी दिल्ली : Corona Updates – आता १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांनाही मार्चपासून कोरोनावरील लस (Corona Vaccine) दिली जाईल, असे जाहीर केले होते. पण आता अशी कुठलीही योजना नसल्याचे घुमजाव केंद्र सरकारने केले आहे. (It was announced that children between the ages of 12 and 14 will be vaccinated against corona from March. But now the central government has said that there is no such plan).

Corona Updates : देशात कोरोनाचे दररोज जवळपास अडीच लाख नवीन रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी जगभरात आणि देशात कोरोनावरील लसीकरण मोहीम (Corona Vaccine) सुरू आहे. या लसीकरण मोहीमेत १८ वर्षावरील सर्वांचे लसीकरण याआधीच होत असताना ३ जानेवारीपासून १५ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू झाले आहे. यामुलांना कोवॅक्सिन लस देण्यात येत आहे. तसेच आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाइन वर्कर्स आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रिकॉशन डोस म्हणजे तिसरा डोस दिला जात आहे. यानंतर आता १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांनाही मार्चपासून कोरोनावरील लस (Corona Vaccine) दिली जाईल, असे सांगण्यात येत होते. पण आता अशी कुठलीही योजना नसल्याचे केंद्रातील सरकारी सूत्रांनी म्हटले आहे. एएनआयने हे वृत्त दिले आहे.

लवकरच १२ ते १४ वर्षांच्या मुलांनाही कोरोनावरील ही लस (Corona Vaccine) मिळणार आहे. येत्या मार्चपासून १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना कोरोनावरील लस दिली जाईल, अशी माहिती NTAGI ग्रुपचे प्रमुख डॉ. एन. के. अरोरा यांनी दिली होती. पण केंद्र सरकारमधील सूत्रांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना कोरोनावरील लस देण्याबाबत अद्याप कुठलाही निर्णय झाला नसल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील अधिकृत सूत्रांनी सांगितले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी