28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रअंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज केलेल्या महिलेबाबत असे घडले की, तिने तहसीलदारांकडेच आत्महत्येची...

अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज केलेल्या महिलेबाबत असे घडले की, तिने तहसीलदारांकडेच आत्महत्येची परवानगी मागितली

गावातील अंगणवाडी सेविकामुळे गावातील बालके आणि गरोदर महिलांचे आरोग्य निरोगी राहत आहे. असे असतानाच एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प अंतर्गत, दहिवडी (माण) अंगणवाडी क्रमांक ०८ साठी अंगणवाडी मदतनीस या पदाकरिता अश्विनी सोमनाथ काटे रा. दानवलेवाडी अर्ज दाखल केला होता. या पदासाठी देण्यात आलेल्या अटींची त्यांनी पूर्तता केली. शिवाय त्या गावातच राहत असल्याने अंगणवाडी मदतनीस या पदासाठी पात्र ठरतील असे वाटत असताना नियम डावलून नोटीस बोर्डवर गुणवत्ता यादीमध्ये प्रथम क्रमांकावर मीनल धनाजी धायगुडे या उमेदवाराचे नाव आढळले. काटे यांनी याबाबतची लेखी तक्रार बालविकास प्रकल्प अधिकारी व गट विकास अधिकारी यांच्याकडे केली होती. पण त्यांना या दोन्ही अधिकाऱ्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्याने अश्विनी सोमनाथ काटे यांना नैराश्य आले असून त्यांनी माण (दहिवडी) चे तहसिलदार यांच्याकडे आत्महत्येची परवानगी मागितली आहे.

बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, प्रकल्प माण( दहिवडी) यांच्यामार्फत अंगणवाडी मदतनीस या पदाकरिता पुढील प्रक्रिया सुरू झाली होती आणि गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. गुणवत्ता यादी आम्ही नोटीस बोर्डवर वाचली. या गुणवत्ता यादीमध्ये आम्हास प्रथम क्रमांकावर मीनल धनाजी धायगुडे या उमेदवाराचे नाव आढळले. या उमेदवाराची आम्ही ग्रामपंचायत दानवलेवाडी येथे माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता आम्हास हे आढळून आले की, ही व्यक्ती दानवलेवाडी गावची रहिवासी नाही. अर्जावरील एकमेव अटी व शर्ती यांचा विचार केला असता उमेदवार ही गावची नागरिक असणे किंवा रहिवासी असणे बंधनकारक आहे असे जाहिरात व प्रसिद्धीपत्रकानुसार गावातील रहिवासी असलेल्या व्यक्तीला प्राधान्य देण्यात येईल असे सूचित करण्यात आले होते. या अनुषंगाने रहिवासी असल्याचा पुरावा सादर करणे जरुरी आहे.
ही बाब काटे यांनी तहसीदार यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केली आहे.

मी स्वतः यापूर्वी लेखी अर्जाद्वारे बालविकास प्रकल्प अधिकारी व गट विकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. त्यांनी मला दिनांक २७ जुलै २०२३ रोजी तक्रारीवर म्हणणे मांडण्यासाठी तोंडी आदेश देऊन बोलवले होते. निवड कमिटीतील तीन सदस्यांनी समोरासमोर आमची तक्रारी संदर्भात विचारणा केली असता आम्ही त्यांना पूर्ण माहिती दिली. त्यावेळी संबंधित कागदपत्रांची पाहणी केली असता या व्यक्तीने कुठल्याही प्रकारचा रहिवासी दाखला जोडला नाही. आधार कार्डवरील पत्ता असलेला भाग जाणीवपूर्वक जोडला नाही. विवाह नोंदणी प्रमाणपत्र देखील जोडणे आवश्यक होते. हे प्रमाणपत्र देखील जोडण्यात आले नाही. त्यामुळे कमिटीतील व्यक्तींनी तुम्ही सांगत असलेली माहिती योग्य आहे. आम्ही संबंधित उमेदवाराचा अर्ज रिजेक्ट करू असे म्हटले. त्यानंतर एकाने असे सांगितले की आम्ही त्यावर निर्णय घेऊ तुम्ही उद्या हजर राहा. मी स्वतः २८ जुलै २०२३ रोजी हजर राहिले असता एकात्मिक बालविकास अधिकारी यांनी सांगितले की, गुणवत्ता यादीनुसार ज्या उमेदवाराचे नाव पहिले आहे त्याच उमेदवाराला आम्ही यादीमध्ये ठेवत आहोत. आठ ते दहा दिवसानंतर ऑर्डर निघेल त्यावेळी पाहू. मी काही कालावधी त्याच परिसरामध्ये थांबले असता नोटीस बोर्डवर नव्याने यादी प्रसिद्ध झाली. या यादीमध्ये देखील या उमेदवाराला पात्र केले आहे. असे अश्विनी सोमनाथ काटे यांनी तहसीलदार यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा
गुजरात नरसंहाराने भाजपाला केंद्रात बसवले, तेच मॉडेल ईशान्य भारतात आयात केले – प्रकाश आंबेडकर
मणिपूर महिला अत्याचार प्रकरण : सरन्यायाधीशांनी विचारले 14 दिवस पोलिसांनी काहीच का केले नाही?

निधी वाटपवरून काँग्रेस भडकली; नाना पटोले यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

ही अधिकारी जाणीवपूर्वक कोणतेही तथ्य नसलेल्या उमेदवाराला संधी देत असून माझ्यासारख्या किंवा इतर योग्य उमेदवाराचा विचार देखील करत नाहीत. यामुळे माझ्या मनामध्ये नैराश्य निर्माण झाले आहे. वारंवार नैराश्येमुळे आत्महत्येचा विचार डोक्यात येत आहे. माझ्या पाठीमागे परिवार आहे त्यांना त्रास होऊ नये म्हणून मी माझ्या आत्महत्येसाठी आपल्याकडे कायदेशीर परवानगी मागत आहे. असेही काटे यांनी तहसीलदार यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी