31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रआदित्य ठाकरे म्हणाले, 7 वाजल्यानंतर गुलाबराव पाटील थरथरायला लागतात

आदित्य ठाकरे म्हणाले, 7 वाजल्यानंतर गुलाबराव पाटील थरथरायला लागतात

टीम लय भारी

कर्जत : एक मंत्री मोठमोठ्या आवाजात बोलायचे. बाप बदलणार नाही असे म्हणायचे. त्यांना आम्ही जवळ केले होते. त्यांची सगळी कामे करायचो. त्या दिवशी संध्याकाळी त्यांना मी आस्थेने गाडीत या म्हणालो. पण ते येईनातच. कारण ७ वाजल्यानंतर त्यांना थरथरायला होते, अशा सुचक शब्दांत आदित्य ठाकरे यांनी बंडखोर मंत्री गुलाबराव पाटील यांची खिल्ली उडविली.

कर्जत येथे आयोजित केलेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. ठाकरे घराण्याला शोभेल असे घणाघाती भाषण आदित्य ठाकरे यांनी केले. शिवसेनेला धोका देवून जे आमदार गेले ते निर्लज्ज, बेशरम आहेत. त्यांनी स्वतःचे इमान विकले आहे. त्यांना थोडी जरी लाज लज्जा असेल तर त्यांनी आपल्या पदाचे राजीनामे द्यावेत. पुन्हा निवडणुका लढवून दाखवाव्यात. त्यांना पाडल्याशिवाय राहणार नाही, असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिले.

पळून गेलेल्या आमदारांमध्ये आमचे १० – १२ जण आहेत. ते परत आमच्याकडे येतीलच. पण जे खरोखर पळून गेलेले आहेत, त्यांना पुन्हा जवळ करणार नाही. त्यातील काही जणांनी इमान विकले, कुणाच्या फायली उघडल्या म्हणून ते पळाले. हे निर्लज्ज, विकाऊ, नालायक आहेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

राजकीय विश्लेषक सांगायचे की, काँग्रेस, राष्ट्रवादी दगा देवू शकतात. पण हे दोन्ही पक्ष भक्कमपणे आमच्या बाजूने उभे आहेत. शरद पवार व सोनिया गांधींनी भक्कम पाठिंबा दिला आहे. परंतु आमच्याच लोकांनी आम्हाला धोका दिल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. जे सन २०१४ मध्ये शिवसेनेत आले, ते आम्हाला हिंदुत्व शिकवू लागले आहेत. बाळासाहेबांची शिवसेना ते आम्हाला शिकवत आहेत. आम्ही हिंदुत्व विसरलेलो नाही. आम्ही अयोध्येला जाऊन आलो. श्रीराम मंदिराविषयी आम्ही बोलत आहोत. जात, पात, धर्म न बघता काम करीत आहोत.

मुख्यमंत्र्यांच्या कठीण काळात या बंडखोरांनी राक्षसी महत्वकांक्षेसाठी फायदा उचलला. जी लोकं पक्षाची झाली नाहीत, बाळासाहेबांची झाली नाहीत, ती महाराष्ट्राचीही होऊ शकत नाहीत. आपल्या राक्षसी महत्वकांक्षेसाठी ही माणसे महाराष्ट्राबाहेर लपून बसली आहेत. शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगडमधील नेते निर्लज्ज वागतील असे वाटले नाही, असे सांगत आदित्य ठाकरे यांनी भरत गोगावले यांच्यावरही निशाणा साधला.

ते पुढे म्हणाले की, शिवसेनेच्या नावाने कुणीही दुसरा गट बनवू शकत नाही. शिवसेनेचे नाव घेण्याची तुमची लायकी नाही. तुम्हाला भाजप, प्रहार किंवा मनसेमध्ये विलीन व्हावे लागेल. तुम्हाला लाज लज्जा असेल तर राजीनामे देवून पुन्हा निवडणूक लढवून दाखवा. तुम्ही परत निवडून येऊ शकणार नाही. फुटीरवादी आमदार अपात्र होणार म्हणजे होणार. त्यांची गाठ प्रत्येक शिवसैनिकाबरोबर आहे. स्वतःचा इमान, आत्मा त्यांनी विकला आहे. माझ्या आजोबा, पणजोबांनी सांगितले होते. पैसा येतो, पैसा जातो, पैसा पुन्हा येतो. पण गेलेले नाव परत येत नाही. या फुटीर आमदारांनी स्वतःचे नाव घालवले आहे. या फुटीर आमदारांनी ३५, ३०, ४०, ५० कोटी रुपयांच्या बोली लावल्याचे आकडे समोर यायचे. शिवसेनेचा इतिहास आहे. ज्यांनी बंडखोरी केली ते नंतर संपले आहेत.

हे सुद्धा वाचा :

भाजपचा शिवसेना फोडण्याचा पहिला डाव यशस्वी : माजी आमदार अनिल गोटे

लवकरच ‘शिंदे‘ मुंबईत येण्याची शक्यता

उद्धव ठाकरे यांना एका आंबेडकरवाद्याचे पत्र !

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी