33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रभाजप कार्यकर्त्यांचे स्वप्न भंगले, विठ्ठलाच्या महापुजेचा मान उद्धव ठाकरेंकडेच !

भाजप कार्यकर्त्यांचे स्वप्न भंगले, विठ्ठलाच्या महापुजेचा मान उद्धव ठाकरेंकडेच !

टीम लय भारी

मुंबई : यंदा विठ्ठल – रखूमाईच्या महापुजेचा मान देवेंद्र फडणवीस यांनाच मिळेल, असे स्वप्न भाजप कार्यकर्त्यांना पडले होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे भाजप कार्यकत्यांचा स्वप्नभंग होईल अशी चिन्हे दिसत आहे.

महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. पुढील सुनावणी येत्या ११ जुलै रोजी घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील पंधरवडाभर महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती ‘जैसे थे’ राहणार आहे. तोपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खूर्चीला कोणताही धोका असणार नाही.

येत्या १० जुलै रोजी एकादशी आहे. त्या दिवशी मुख्यमंत्रीपदावरील व्यक्तीला सपत्नीक विठ्ठल रखूमाईच्या महापुजेचा मान मिळतो. महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता निर्माण झाल्याने यंदाच्या महापुजेचा मान उद्धव ठाकरेंकडून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाणार असा जोरदार प्रचार भाजप कार्यकर्त्यांनी केला होता. पण न्यायालयाने नेमका १० जुलैपर्यंत उद्धव ठाकरे यांच्या सरकारला दिलासा आहे. १० जुलैला उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे विठ्ठलाची पुजा करतील, व दुसऱ्या दिवशी ११ जुलैला न्यायालयात सुनावणी होईल.

हे सुद्धा वाचा : 

संजय राऊतांचे तोंड बंद करण्यासाठी विरोधकांनी ‘ईडी’ला केले पुढे

राजेंद्र यड्रावकरांचे समर्थक आणि शिवसैनिक आपापसात भिडले

उद्धव ठाकरे यांना एका आंबेडकरवाद्याचे पत्र !

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी