27 C
Mumbai
Monday, July 8, 2024
Homeमहाराष्ट्रअखेर राज ठाकरेंचे विधान सत्य? लवकरच फटाक्यांच्या माळा...

अखेर राज ठाकरेंचे विधान सत्य? लवकरच फटाक्यांच्या माळा…

टीम लय भारी

मुंबई :- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचे आरोप लावले होते. या आरोपावरून अखेर गृहमंत्री अनिल देशमुखांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला चौकशीचे आदेश दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या एका वक्तव्याची चर्चा होत आहे, ज्यात त्यांनी केंद्र सरकारकडून चौकशीची मागणी केली होती. केंद्र सरकारने निष्पक्ष चौकशी केली तर फटाक्याची माळ लागेल, असे भाकीत राज ठाकरेंनी केले होते.

अनिल देशमुख यांनी मुंबई पोलीस दलातील निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना दरमहा १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते, असे आरोप करणारे पत्र मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले होते. यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. भाजपनंतर राज ठाकरे यांनीही गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या प्रकरणात केंद्राने हस्तक्षेप करुन तपास करावा, केंद्राने योग्य चौकशी केल्यास फटाक्यांची माळ लागेल, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले होते.

तर मुख्यमंत्र्यांचीही चौकशी होईल का? मनसेचा सवाल

अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सीबीआयच्या तपासात फक्त गृहमंत्रीच नाही, तर मुख्यमंत्र्यांनाही बोलावले जाईल का असा प्रश्न येतो. कारण, सर्व प्रकाराची माहिती मुख्यमंत्र्यांनाही दिली होती असे अनिल देशमुख यांनी सांगितले होते, असा सवाल देशपांडे यांनी केला.

राजीनाम्यानंतर अनिल देशमुख दिल्लीला रवाना

दरम्यान, राजीनामा दिल्यानंतर अनिल देशमुख थेट दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्लीत ते कायदेतज्ञांचा सल्ला घेणार असल्याची माहिती आहे. पुढच्या १५ दिवसात सीबीआयने प्राथमिक चौकशी पूर्ण करावी आणि त्यानंतर काय करायचे याचा निर्णय सीबीआय प्रमुखांनी घ्यावा, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी