29 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्रअजित पवार यांनी लाचखोर महिला अधिकाऱ्याचा मुद्दा मांडला; फडणवीसांनी चौकशीची घोषणा केली

अजित पवार यांनी लाचखोर महिला अधिकाऱ्याचा मुद्दा मांडला; फडणवीसांनी चौकशीची घोषणा केली

अनाथालयाला अनुदान वितरीत करण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या महिला व बालकल्याण विभागाच्या महिला अधिकाऱ्याची चौकशी करण्याची मागणी शुक्रवारी विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी विधिमंडळात केली. (Ajit Pawar raised issue bribe) त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या प्रकरणात चौकशी (Inquiry) करुन कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

अजित पवार म्हणाले, उच्च न्यायालयाकडून अनुदानाचा प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना असतानाही ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि राष्ट्रसेवा दलाचे नेते पन्नालाल सुराणा यांच्या उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील “आपले घर” या अनाथालयाला अनुदान देण्यात टाळाटाळ करत लाच देण्याची मागणी केली जात आहे, त्यामुळे महिला व बालकल्याण विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी असे पवार म्हणाले. या प्रकरणाची चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिले.

विधानसभेत स्थगन प्रस्तावाद्वारे हा मुद्दा उपस्थित करताना अजित पवार म्हणाले की, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी राष्ट्रसेवा दलाचे नेते पन्नालाल सुराणा नळदुर्ग येथे “आपले घर” हे अनाथालय चालवित आहेत. 30 ऑक्टोबर 1993 रोजी लातूर व उस्मानाबाद येथे झालेल्या भुकंपामध्ये मृत्यू पावलेल्या पालकांच्या अनाथमुलांसाठी हे अनाथालय त्यांनी सुरु केले होते. या अनाथाश्रमाच्या अनुदानाचा प्रश्न मार्गी लावण्याचे उच्च न्यायालयाच्या सूचना आहेत. पहिल्या वर्षी 250-300 मुले असणाऱ्या या अनाथालयात मुलांची संख्या वाढत असून 2000 पासून या संस्थेला शासकीय अनुदान सुरु झाले आहे. 2013-14 व 2014-15 चे 25 लाख 12 हजार अनुदान प्रलंबित राहील्याने संस्थेने औरंगाबाद येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठात दाद मागितली.

हे सुद्धा वाचा

शेतकऱ्याकडून एक लाखांची लाच घेताना उपजिल्हाधिकाऱ्यासह, लिपीक आणि वकिलाला अटक

ऋषभ पंतला पेंग आल्यामुळे झाला अपघात; दोनशे मीटर पर्यंत गाडीने घेतल्या पलट्या..

विवेक अग्निहोत्रीच्या मुलीचे ‘बेशरम रंग’ व्हायरल; भगव्या बिकीनीतील अश्लील फोटोवरून हिंदुत्वाचा ‘पठाण’ अडचणीत !

उच्च न्यायालयाने सदरचे अनुदानाचा प्रश्न मार्गी लावण्याच्या सुचना दिल्या. त्यानंतरही महिला व बालकल्याण विभागाने त्या प्रकरणात काही त्रुटी काढणे, एका किराणा बिलात घोळ आहे व ट्रस्टचे आधार कार्ड नाही अशा वेगवेगळ्या कारणांची त्रुटी काढून वेळोवेळी अनुदान नाकरले आहे. या प्रलंबित अनुदानातील त्रुटीच्या पुर्ततेसाठी सुराणा वैयक्तिकरित्या पुणे येथील महिला व बाल कल्याण विभागाच्या कार्यालयात गेले असता संबंधित अधिकाऱ्याने त्रुटीसंदर्भात उडवाउडवीची उत्तरे दिली.
काळ बदललेला आहे तुम्हीही बदला, तरच कामे होतील, असे सांगुन वेगळ्या प्रकारे लाचेची मागणी केली. राज्यातील अनेक अनाथाश्रमाचे अनुदान रोखण्यात येत असून लाच दिल्याशिवाय अनुदान वितरीत केले जात नाही, ही वस्तुस्थिती सांगत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महिला व बालकल्याण विभागातील भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी केली.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी