31 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeमहाराष्ट्रअजित पवार कोल्हापूरात आले, अन् हात हलवत परत गेले

अजित पवार कोल्हापूरात आले, अन् हात हलवत परत गेले

प्रशांत चुयेकर

कोल्हापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच कोल्हापूर दौरा केला ( Ajit Pawar visits Kolhapur ). ‘मास्क न वापरता रस्त्यावरून फिराल तर निर्बंध वाढवणार’ अशा दादागिरीच्या भाषे पलीकडे त्यांनी कोणतीही घोषणा केली नाही.

अजित पवार आले आणि चहा पिऊन गेले अशी प्रतिक्रिया कोल्हापूरवासीय यांच्याकडून व्यक्त केली जात आहे ( Ajit Pawar didn’t announced any package for Kolhapur ).

कोल्हापुरात ‘कोरोना’चा प्रादुर्भाव राज्यात सर्वाधिक आहे ( Corona Pandemic in Kolhapur ). यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांचा कोल्हापुरात दौरा होता. कोल्हापुरात अनेक रुग्ण आणि नातेवाईक यांची दयनीय अवस्था झाली आहे. या रुग्णांना बरे होण्यासाठी, त्यांचा जीव वाचावा म्हणून आवश्यक वैद्यकीय सुविधांची गरज आहे. अजित पवार यांनी त्याबाबत काहीही घोषणा केली नाही.

हे सुद्धा वाचा

सदाभाऊ खोत यांनी ‘महाविकास आघाडी’ला दिली भन्नाट उपमा, तुम्हालाही हसू येईल !

अजित पवार आणि शाहू महाराजाच्या भेटीनंतर संभाजीराजेंनी व्यक्त केले मत…

उद्धव ठाकरेंनी नाना पटोलेंना ठणकावले

राहुल गांधी… २०२४ सालातील देशाचे पंतप्रधान

कोल्हापूरकरांनो, आम्हाला हौस नाही, थोडं सोसा, अजित पवारांनी दरडावलं

राज्याचे उपमुख्यमंत्रीपद असून सुद्धा कोल्हापुरात आल्यावर पवार यांची पॉवर कमी झाली का अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

कोल्हापुरात पालकमंत्री सतेज पाटील यांनी आधीच काही घोषणा करण्यापूर्वी हसन मुश्रीफ आपली पत्रकार परिषद घेत असतात. प्रसिद्धी व श्रेय आपल्याला मिळावे यासाठी ते प्रयत्नशिल असतात. पत्रकार परिषदेतही पालकमंत्री ‘अमूक तमूक’ माहिती देतील, असा ‘प्रोटोकॉल’ मुश्रीफ सांभाळत असतात. प्रसिद्धीसाठी हपापलेल्या अशा मंत्र्यांनीसुद्धा अजित पवार यांच्याकडे कोणतीही मोठी मागणी केली नाही ( Hasan Mushriff and Satej Patil unable to do something to Kolhapur ).

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी दूध संघाच्या निवडणुकीत ( Gokul elction in Kolhapur ) गर्दी मुळेच ‘कोरोना’चे रुग्ण वाढल्याची टीका विरोधक करीत आहेत. त्याची जबाबदारी स्वीकारून किमान उपमुख्यमंत्री यांच्याकडून वैद्यकीय सुविधा व हॉस्पिटलबाबत भरीव पॅकेज घेतले असते तर किमान बरे झाल असते अशी भावना नागरीकांकडून व्यक्त केली जात आहे ( Ajit Pawar should announce something for Kolhapur ).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी