30 C
Mumbai
Monday, May 13, 2024
Homeमहाराष्ट्रसदाभाऊ खोत यांनी ‘महाविकास आघाडी’ला दिली भन्नाट उपमा, तुम्हालाही हसू येईल !

सदाभाऊ खोत यांनी ‘महाविकास आघाडी’ला दिली भन्नाट उपमा, तुम्हालाही हसू येईल !

महेश आटोळे : टीम लय भारी

दौंड / रावणगाव : शेलक्या शब्दांचा वापर करून विरोधकांना नामोहरण करण्याची हातोटी शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांच्याकडे आहे ( Sadabhau Khot attacks on Mahavikas Aghadi Government ). आपल्या या स्वभावानुसार खोत यांनी ‘महाविकास आघाडी’ला ‘अली बाबा आणि 40 चोर’ अशी भन्नाट उपमा जाहीर कार्यक्रमात दिली आहे.

आपल्या भाषणात सदाभाऊ म्हणाले की, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या चार हजार कोटी रुपयांच्या पीक विम्याची लूट सरकारने केली. दूध उत्पादक शेतकऱ्यांना देशोधडीला लावले ( Sadabhau Khot’s speech ).

महाविकास आघाडी सरकारने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकरी वर्गावरती अन्याय केला आहे. ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडून त्यांच्या दुःखात आणखी भर घालण्याचे काम या महाविकास आघाडी सरकारने केले ( Sadabhau Khot said, Mahvikas Aghadi government did injustice with farmers ).

ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण घालविण्याचे पाप या सरकारने केले आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची या सरकारची मनापासून इच्छा नाही. हे सरकार आंधळे, बहिरे आणि मुके झाले असून कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त वसुली करण्याचे काम हे सरकार करीत आहे

– सदाभाऊ खोत ( Sadabhau Khot )

महाविकास आघाडी सरकारकडून आता काय अपेक्षा ठेवायच्या असा प्रश्न खोत यांनी उपस्थित केला ( Sababhau Khot blamed to Mahavikas Aghadi Government for OBC and Maratha reservation issue ).

वासुदेव काळे यांची भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा रावणगाव (ता.दौंड ) ग्रामस्थांच्या वतीने आज शनिवार (ता.१९ ) रोजी नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने खोत ( Sadabhau Khot ) बोलत होते.

हे सुद्धा वाचा

दुधाच्या भाववाढीसाठी माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे मंत्रालयासमोर आंदोलन

तुम्ही भिजण्यापेक्षा शेतकऱ्याची जमीन भिजवा, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटलांवर निशाणा साधला

मकरंद अनासपुरे, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. तात्याराव लहाने, इंदोरीकरांसह बारा जणांना आमदार करा, सदाभाऊ खोत यांची राज्यपालांकडे मागणी

शंभूराज देसाईंचे सदाभाऊ खोतांना आव्हान

आपण आजपासून दौंड तालुक्यातील रावणगाव या गावातूनच शेतकऱ्यांचे विविध प्रश्न समजून घेण्यासाठी रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात करीत असल्याची घोषणा यावेळी सदाभाऊ खोत यांनी केली ( Sadabhau Khot announce agitation against Mahavikas Aghadi Government ).

नागरी सत्कारावेळी आमदार राहुल कुल म्हणाले की, दौंड तालुक्यातील जनतेच्या हिताच्या दृष्टीने पाण्याच्या प्रश्नासह रस्ते, रेल्वे, आरोग्य विषयक समस्या सोडविण्यावरती भर देणार आहे. तालुक्यातील जिल्हा न्यायालयाचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून तालुक्यात लवकरच प्रांत कार्यालय देखील आणणार आहे ( MLA Rahul Kul speech ).

यावेळी वासुदेव काळे यांचा भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र राज्य किसान मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रावणगाव ग्रामस्थांच्या वतीने काळे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. रावणगावचे सुपुत्र भारतीय जनता पार्टीचे दौंड तालुका उपाध्यक्ष वैभव आटोळे, विकास आटोळे आणि शिवसेनेचे दौंड विधानसभा क्षेत्र प्रमुख अजित आटोळे यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. यावेळी या सत्काराला उत्तर देताना काळे यांनी रावणगावकरांचे आभार मानत मिळालेल्या या पदाचा उपयोग शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी करणार असल्याचे मत व्यक्त केले.

Sadabhau Khot attacks on Mahavikas Aghadi Government
सदाभाऊ खोत यांनी आठवडाभरापूर्वी मंत्रालयासमोर आंदोलन केले होते

या कार्यक्रमाच्या निमित्ताने कोरोनाच्या काळात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल अँड. रविंद्र पोमणे, डॉ. प्रफुल्ल बिडवे, भिमा पाटस कारखान्याचे माजी संचालक संपत आटोळे, अँड. अमर गाढवे, पत्रकार रमेश आटोळे आदी मान्यवरांचा सत्कार माजी कृषी सदाभाऊ खोत ( Sadabhau Khot ) आणि आमदार राहुल कुल यांच्या हस्ते करण्यात आला.

या प्रसंगी भाजपाचे दौंड तालुका अध्यक्ष माऊली ताकवणे, रयत क्रांती संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष सिमा पवार, ग्रामविकास आघाडीचे जिल्हा सह संयोजक गणेश आखाडे, रयत संघटनेचे राज्य प्रवक्ते भानुदास शिंदे, रयत क्रांती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सर्फराज शेख, रयत क्रांती महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा अनिता ताकवणे, दौंड पंचायत समितीचे माजी सदस्य मानसिंग गाढवे, रावणगाव सोसायटीचे माजी चेअरमन मुगाजी आटोळे, भिमा पाटसचे माजी संचालक लक्ष्मण रांधवण, अरुण आटोळे यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी