29 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रअजित पवारांचा धसका, वर्षा, सागर बंगल्यावरील अतिथींच्या पाहुणचार खर्चाला कात्री !

अजित पवारांचा धसका, वर्षा, सागर बंगल्यावरील अतिथींच्या पाहुणचार खर्चाला कात्री !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर येणाऱ्या अतिथींच्या खानपानावर तब्बल २ कोटी ३८ लाख रुपये खर्च करण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करून विधानसभेतील विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी कान टोचल्यानंतर शिंदे- फडणवीस सरकारला जाग आली असून पाहुणचारावर होणाऱ्या खर्चाला कात्री लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर येणाऱ्या लॊकांच्या चहापानावर इतका वारेमाप खर्च कसा झालाय? चहामध्ये सोन्याचं पाणी घातलं जात होतं काय ? असा सवाल अजित पवार यांनी अर्थसंकल्प अधिवेशनापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना उपस्थित केला होता.

पवार यांच्या या प्रश्नाची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या वर्षा आणि सागर बंगल्यावर येणाऱ्या अतिथींच्या पाहुणचारावर केल्या जाणाऱ्या खर्चावर नियंत्रण आणण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही बंगल्यावर अतिथींच्या पाहुणचारासाठी पुरवठादार निश्चित करण्यात आले असून दोन वेगवेगळ्या खासगी कंत्राटदारांना पाहुणचाराचे कंत्राट देण्यात आले आहे.

वर्षा बंगल्यावरील अतिथींच्या पाहुणचारावर साडेतीन कोटी तर सागर बंगल्यावरील पाहुणचारावर दीड कोटी रुपये खर्च झाल्याचे सांगण्यात आले होते. खानपान सेवा पुरविणाऱ्या पुरवठादाराची नियुक्ती करण्यासाठी गेल्या वर्षी ५ कोटी रुपयांची ई निविदा जाहीर करण्यात आली होती. दोन्ही कंत्राटदारांशी सरकारने करार केले असून अतिथींना पुरविण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांचे दरही निश्चित करण्यात आले आहेत.

हे सुद्धा वाचा
मुंब्रा बायपास बंद; काटई, खोणी, तळोजा, कल्याण-डोंबिवलीत वाहतूककोंडी

शहरांची नावे बदलण्याचे राजकारण सावरकरांनी 63 वर्षांपूर्वीच सुरू केले

गॅस दर घटणार; मोदी सरकार जनतेला महागाईपासून दिलासा देणार  

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी