31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रअजितदादा होणार मुख्यमंत्री सुप्रिया सुळेंनी देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार

अजितदादा होणार मुख्यमंत्री सुप्रिया सुळेंनी देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार

देवेंद्र फडणवीस 2024 मध्ये अजित दादांना मुख्यमंत्री पाच वर्षे करत असतील तर मी पहिल्यांदा दादांना हार घालणार असं वक्तव्य सुप्रियाताई सुळे यांनी केलं. देवेंद्र यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे.भाजप हा मोठाआहे. मोठ्या भावाने फक्त त्यागच केला पाहिजे. असं देवेंद्रजी यांचं म्हणणं आहे. त्या म्हणण्याला मला आनंद वाटतो की काँग्रेस मुक्त भारत म्हणताय आणि त्याच काँग्रेसला मुख्यमंत्रिपद देताय , असा टोलाही सुळे यांनी  मारला.

 

देवेंद्र फडणवीस 2024 मध्ये अजित दादांना मुख्यमंत्री पाच वर्षे करत असतील तर मी पहिल्यांदा दादांना हार घालणार असं वक्तव्य सुप्रियाताई सुळे यांनी केलं. देवेंद्र फडणवीस  यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे.भाजप हा मोठाआहे. मोठ्या भावाने फक्त त्यागच केला पाहिजे. असं देवेंद्रजी यांचं म्हणणं आहे. त्या म्हणण्याला मला आनंद वाटतो की काँग्रेस मुक्त भारत म्हणताय आणि त्याच काँग्रेसला मुख्यमंत्रिपद देताय, असा टोलाही सुळे यांनी  मारला.

मुंबई महापालिकेची सूत्रे हाती घेतलेले भूषण गगराणी आहेत तरी कोण?

राज ठाकरेंनी स्वत:चा एकनाथ शिंदे, अजित पवार होऊ देवू नये

केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचा धक्का; ‘फॅक्ट चेक’ युनिटच्या सूचनेला स्थगिती

याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना मुख्यमंत्री करू असं एका ठिकाणी बोलून दाखवलं.
यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या नेत्या खा.  सुप्रियाताई यांनी प्रतिक्रिया दिली. फडणवीस यांच्या आदी  मी दादांना हार घालून अभिनंदन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतीय जनता पार्टीने शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फोडली.यामध्ये अजित पवार यांना उपमुख्यमंत्री केले. त्यांच्या सहकार्यांना सुद्धा कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले. यापूर्वी सुद्धा अजितदादा यांनी पहाटेचा शपथविधी घेऊन भाजपबरोबर जाण्याचा प्रयत्न केला.मात्र तो अयशस्वी झाला.
अजित पवार भाजपकडे गेले तरी त्यांचे मुख्यमंत्री पदाचे स्वप्न कसे पूर्ण होणार असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष यांच्या गटाकडून विचारला जात होता. काँग्रेस-राष्ट्रवादीकडूनच त्यांना मुख्यमंत्री होण्याची संधी होती. देवेंद्र फडणवीस असताना मुख्यमंत्रीची स्वप्न त्यांची कशी पूर्ण होणार असा प्रश्न वारंवार विचारला जात आहे.

सुप्रिया सुळेंची अजित पवारांना भीती
सुप्रिया सुळे राजकारणात आल्यापासून मुख्यमंत्री पद आपल्याला मिळणार नाही अशी भीती अजित पवार यांना वाटते.त्यामुळेच ते पक्ष सोडण्याचे राजकारण करतात, असेही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मधून बोलले जाते

कोण आहेत सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भारतीय राजकारणी आहेत. सध्या त्या बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या १७ व्या लोकसभेतील खासदार आहेत. त्यांनी यापूर्वी १५व्या आणि १६व्या लोकसभेत खासदार म्हणून काम केले आहे. २०११ मध्ये त्यांनी स्त्री भ्रूणहत्येविरोधात राज्यव्यापी मोहीम सुरू केली.  अलीकडेच त्यांना सामाजिक सेवेसाठी ऑल लेडीज लीगतर्फे मुंबई महिला ऑफ द डिकेड अचिव्हर्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ४ मार्च १९९१ रोजी सदानंद भालचंद्र सुळे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांना विजय आणि एक रेवती ही दोन अपत्ये आहेत. लग्नानंतर त्यांनी कॅलिफोर्नियामध्ये काही काळ घालवला, जिथे त्यांनी यूसी बर्कलेमध्ये जल प्रदूषणाचा अभ्यास केला. त्यानंतर त्या इंडोनेशिया आणि सिंगापूरला गेल्या आणि नंतर मुंबईला परतल्या. 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी