33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रऔरंगाबाद, उस्मानाबाद नामांतरणाच्या वाटेतील काटे दूर; आज नोटिफिकेशन निघणार?

औरंगाबाद, उस्मानाबाद नामांतरणाच्या वाटेतील काटे दूर; आज नोटिफिकेशन निघणार?

औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयाचे नामकरण उद्या सकाळी ‘छत्रपती संभाजी नगर विभागीय आयुक्त कार्यालय’ होण्याची शक्यता आहे. आज उशिरा यासंदर्भातील अधिसूचना (नोटिफिकेशन )जारी होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव नामकरणबाबतची सुद्धा अधिसूचना जारी होण्याची शक्यता आहे.

उध्दव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी औरंगाबाद जिल्ह्याचे नामकरण छत्रपती संभाजी नगर तर उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण केले होते. एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी पुन्हा अधिकृतपणे या दोन्ही जिल्ह्यांचे अनुक्रमे छत्रपती संभाजी नगर आणि धाराशिव असे नामकरण केले होते. पण त्याला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.

१६ जुलै २०२२ मध्ये औरंगाबादचे नाव बदलून ‘छत्रपति संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे नामकरण ‘धाराशिव’ करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. मोहम्मद अहमद, अण्णासाहेब खंदारे आणि राजेश मोरे यांनी न्यायालयात आव्हान दिले होते. या दोन्ही जिल्ह्यांचे नामकरण केल्याने जातीय आणि धार्मिक तणाव निर्माण होत असल्याची बाब याचिकाकर्त्यांनी याचिकेत केली होती.

मुख्य न्यायाधीश संजय गंगापुरवाला आणि न्यायमूर्ति संदीप मार्ने यांच्या न्यायालयात या प्रकरणी सुनवाई झाली. तेव्हा केंद्र सरकारने उस्मानाबादचे नामकरण धाराशिव करण्यावर कोणतीही हरकत नाही. मात्र औरंगाबादचे नामकरण करण्याची प्रक्रिया अजून विचाराधीन आहे, असे स्पष्ठ केले होते.

हे सुद्धा वाचा 
मी अम्मा होता, होता राहिले; गिरीजा ओकने सांगितला ‘तो’ किस्सा !
“हे तर येड्याचे सरकार!” मंत्रीमंडळ बैठकीवर कोट्यवधींच्या उधळपट्टीवरुन नाना पटोलेंचा घणाघात..
वंचितच्या प्रवक्त्यांना मीडियापासून ‘वंचित’ ठेवण्याचे कारस्थान; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल

त्यानंतर सुप्रीम कोर्टने औरंगाबाद शहराचे नामकरण ‘छत्रपति संभाजीनगर’ करण्याला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड़, पी. एस नरसिम्हा आणि जे. बी पारदीवाला यांच्या खंडपीठाने सुनावणी करण्यास नकार दिला. सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावताना पुन्हा उच्च न्यायालयात जाण्याचे आदेश याचिकाकर्त्यांना दिले. त्यामुळे सरकारच्या वाटेतील काटे दूर झाले. म्हणूनच की काय औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयाचे नामकरण छत्रपती संभाजी नगर विभागीय आयुक्त कार्यालय आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव नामकरणाची अधिसूचना जारी होण्याची शक्यता आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी