28.4 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रBalasaheb Thorat : भाजपने राजकीय धुळवड थांबवून विकासावर चर्चा करावी, बाळासाहेब थोरातांचा...

Balasaheb Thorat : भाजपने राजकीय धुळवड थांबवून विकासावर चर्चा करावी, बाळासाहेब थोरातांचा सल्ला

टीम लय भारी

संगमनेर : राज्यघटनेने विधानसभेला assembly elections 2022 अध्यक्ष व उपाध्यक्ष तातडीने मिळावेत असे सांगितले आहे मात्र, याबाबत भाजपाकडून हायकोर्ट कोर्ट (High court), सुप्रीम कोर्टात (Supreme Court) जाण्याचे राजकारणात अत्यंत दुर्दैवी असून सध्याची राजकीय धुळवड थांबून विकासावर चर्चा झाली पाहिजे,असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी व्यक्त केले आहे. (Balasaheb Thorat said, BJP leaders should discuss developers)

थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार हे अत्यंत चांगले काम करत आहे. कोरोना पाठोपाठ आलेले निसर्ग चक्रीवादळ, अशा अनेक संकटातून मार्ग काढत या सरकारने आर्थिक स्रोत कमी असतानाही सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी काम केले आहे. या कामाचा देशपातळीवरील गौरव झाला आहे. ते संगमनेरमध्ये (Sangamner) विविध माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.

देवेंद्र फडणवीसांना लगावला टोला

सध्या राज्यांमध्ये सुरू असलेली राजकीय धुळवड ही दुर्दैवी असून आपण जनतेचे प्रतिनिधी आहोत विकासावर चर्चा झाली पाहिजे अशी आपली भावना आहे असे बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले तर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Bjp leader devendra fadanvis) हे आम्ही पुन्हा येणार असे म्हणाले यावर बोलताना  थोरात म्हणाले की, मागील वेळेस ही ते असेच म्हटले होते. ते ज्यावेळेस आम्ही परत येऊ असे म्हणतील त्यावेळेस ते येणार नाही हे सत्य आहे. त्यामुळे 2024 मध्ये आम्ही महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) सत्तेवर येईल असा विश्वास व्यक्त करताना भाजपाचे राजकारण हे लोकशाहीला (Lokshahi) अभिप्रेत नाही .त्यांची कार्यपद्धती ही देशहिताची नाही म्हणून भाजपला दूर ठेवण्यासाठी सर्व पक्ष व जनतेने प्रयत्न केले पाहिजे.

कट्टरतावाद हा आम्हाला मान्य नसून सर्वधर्मसमभाव मानणारा आमचा विचार आहे. राज्यघटनेच्या मूलभूत तत्त्वांवर ज्यांची निष्ठा आहे. त्यांना सोबत घेऊन आम्ही काम करणार आहोत .राज्यामध्ये महा विकास आघाडी सरकार स्थिर व भक्कम असून 2024 मध्ये पुन्हा महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.(Balasaheb Thorat)


हे सुद्धा वाचा –

Maharashtra revenue minister Balasaheb Thorat announces stay on NA tax notices to housing societies in Mumbai, Pune

Kangana Ranaut visits Vaishnodevi with sister Rangoli, Kareena Kapoor and Samantha Ruth Prabhu wish Queen actor

Balasaheb Thorat : वडगावपान सोसायटी निवडणुकीत शेतकरी ग्राम विकास मंडळाचे वर्चस्व

Balasaheb Thorat : पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक महाविकास आघाडी एकत्रच लढणार- बाळासाहेब थोरात

भारताच्या पहिल्या राष्ट्रपती पदासाठी होणार होती या मराठी माणसाची नियुक्ती, पण..

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी