31 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्रराज्य शासनाचा बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार पत्रकार संदीप काळे यांना जाहीर

राज्य शासनाचा बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार पत्रकार संदीप काळे यांना जाहीर

रसिका जाधव : टीम लय भारी

मुंबई :  पत्रकारितेच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी राज्य शासनाच्यावतीने दिले जाणारे 2019 वर्षासाठीचे पत्रकारिता पुरस्कार शनिवारी (दि.१४) जाहीर करण्यात आले आहेत. विकास वार्तांकनासाठी 2019 साठीचा राज्यस्तरीय बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार हा दै. युथ सकाळचे संपादक संदीप काळे यांना जाहीर करण्यात आला (Balshastri Jambhekar Award Sandip Kale, editor of Youth Sakal, was announced).

मुंबईत लवकरच होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. 51 हजार रुपये, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार संजय आवटेंना तर डॉ. आण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार रणजितसिंह डिसलेंना जाहीर

Socialwork : पत्रकाराच्या सतर्कतेमुळे जालना जिल्ह्यातील मजूरांची २०० किलोमीटरची पायपीट थांबली

संदीप काळे यांच्या लिखाणाची सुरुवात प्रतिभा निकेतन विद्यालयाच्या प्रेरणा या वार्षिक विशेषंकापासून झाली. या अंकामध्ये ‘गरिबीवर इलाज नाही’ असा संदीप काळे यांचा पहिला लेख प्रसिद्ध झाला होता. त्याच प्रतिभा निकेतन महाविद्यालयात असताना लोकमतचे युवामंच प्रतिनिधी म्हणून त्यांची निवड झाली आणि महाविद्यालयाचे वार्तांकन लोकमतमधून करु लागले (He was elected as the Youth Forum representative of Lokmat and started airing the college through Lokmat).

पत्रकारितेची पदवी मिळवल्यानंतर ‘लोकमत’ ‘सांजवार्ता’, ‘प्रहार, ‘आयबीएन लोकमत’, ‘उद्याचा मराठवाडा’ अशा वेगवेगळ्या दैनिकात आणि न्यूज चॅनलमध्ये त्यांनी काम केले आहे. ‘नेटवर्क 18’ सारख्या भारतातील प्रसिद्ध माध्यम समूहांमध्ये त्यांनी काम केलेले आहे. नांदेड येथील विवेकानंद महाविद्यालयात पत्रकारिता विभागाचे विभागप्रमुख म्हणूनही त्यांनी शिक्षण क्षेत्रात आपले योगदान दिले आहे.

राज्यातल्या पत्रकारांसाठी जितेंद्र आव्हाड सरसावले, मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी

https://english.lokmat.com/maharashtra/maharashtra-govt-announces-2019-best-journalism-award-check-out-list/

जय महाराष्ट्र या प्रसिद्ध मराठी न्यूज चॅनेलसाठी मराठवाडा संपादक म्हणून काम पहिल्या नंतर २०१३ पासून सकाळ माध्यम समूहात ते संपादक आहेत. तसेच याच सकाळ माध्यम समूहाच्या द्वारे चालवण्यात येणाऱ्या यिन या चळवळीची सुरूवात त्यांनी केली (He started the Yin movement, run by Sakal Media Group).

यिनच्या माध्यमातून महाराष्ट्रभर सर्व महाविद्यालयात निवडणूका आणि त्या माध्यमातून यिन मंत्री मंडळाची नेमणूक करण्यात येते. तसेच या मंत्री मंडळाच्या माध्यमातून राज्यात शिक्षण आणि विकास या क्षेत्रात विविध कार्यक्रम पार पडले जातात. यात फूटपाथ स्कुल, मॉडेल व्हिलेज, निसर्ग संवर्धन, व्यक्तीमत्व विकास अशा अनेक उपक्रमांचा समावेश आहे.

Balshastri Jambhekar Award Sandip Kale was announced
दै. युथ सकाळचे संपादक संदीप काळे

यिनचे जाळे राज्यातल्या सर्व महाविद्यालयात पसरले आहे. यिनमध्ये आज काम करणाऱ्या युवकांची संख्या २५ लाखांच्या घरात आहे. या शिवाय राज्यातील अनेक सामाजिक उपक्रमात त्यांचा सहभाग असतो.

2019 च्या पुरस्कारांसाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या अध्यक्षतेखालील पुरस्कार निवड समितीत पत्रकार नरेंद्र कोठेकर, विद्याधर चिंदरकर, रेनी अब्राहम, इंद्रकुमार जैन, शेख मोहम्मद अस्लम, रश्मी पुराणिक, रवींद्र आंबेकर, अशोक पानवलकर, अरुण कुलकर्णी, संचालक (माहिती) यांचा समावेश होता.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी