27 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रनितीन गडकरींवर 'दाढीवाल्या'चा दबाव, नाना पटोेलेंचा आरोप

नितीन गडकरींवर ‘दाढीवाल्या’चा दबाव, नाना पटोेलेंचा आरोप

टीम लय भारी

मुंबई: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे शिवसेना कार्यकर्त्यांची तक्रार केली आहे. गडकरींनी हे पत्र वरच्या ‘दाढीवाल्याच्या’ दबावात लिहिले आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी नितीन गडकरींवर केला आहे (Nana Patole has alleged that Nitin Gadkari).

महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्गांचे काम व्हायला पाहिजे. जे लोक याला विरोध करतात, काम बंद पाडतात, त्यांचे समर्थन काँग्रेस करत नाही. रस्ते व्हावे या बाजूने काँग्रेस आहे. मात्र, 25 वर्षे शिवसेना आणि भाजप एकत्र होती. तेव्हा गडकरींना शिवसेना कशी काम करते, हे माहिती नव्हते का? गडकरींना वरुन दाढीवाल्याने आरोप करायला सांगितले का? असा आरोप पटोले यांनी केला आहे.

‘तो’ बॉम्बस्फोट म्हणजे राहुल गांधींना संपवण्याचा कट तर नाही ना? नाना पटोलेंचा गंभीर आरोप

केंद्र सरकारच्या लस उत्पादन निर्णयांबाबत नितीन गडकरी अलिप्त

महामार्गाच्या कामात अनियमितता आणि भ्रष्टाचार असल्याची अनेक पत्र त्यांच्या मंत्रालयाला दिली आहे. त्याची चौकशी आणि एक श्वेतपत्रिका गडकरी यांनी काढावी. महामार्गाची कामें झाली पाहिजेत. जर या कामात कुणी अडथळा आणत असेल तर त्यांना काँग्रेस विरोध करेल, असे पटोले म्हणाले (Nana Patole said that if anyone was obstructing the work, the Congress would oppose them).

Nana Patole has alleged that Nitin Gadkari
गडकरींना वरुन दाढीवाल्याने आरोप करायला सांगितले

आम्हीही अशी थप्पड देऊ की समोरील व्यक्ती आपल्या पायांवर पुनः उभी राहू शकणार नाही’, उद्धव ठाकरे

Nitin Gadkari writes to Uddhav Thackeray, says Sena leaders creating hurdles in highway projects

काय म्हणाले आहेत गडकरी पत्रामध्ये?

मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या दोन पानी पत्रात राज्यात सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या कामात शिवसेनेचे लोकप्रतिनिधी अडथळा आणत असल्याची तक्रार गडकरी यांनी  केली आहे. राज्यात सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांत तीन ठिकाणी नियमबाह्य कामांसाठी अधिकारी आणि कंत्राटदार यांना त्रास दिला जात आहे, यामुळे काम बंद पडण्यापर्यंत परिस्थिती गेली असल्याबद्दल तीव्र संताप नितीन गडकरी यांनी या पत्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केला आहे. एवढेच नाही ही परिस्थिती कायम राहिली तर कामे सुरु ठेवावीत का ? याचा विचार आपला विभाग करत आहे अशी स्पष्ट भूमिका गडकरी यांनी घेतली आहे.

अर्धवट रस्त्यांची कामे ही रस्ते वाहतुकीस धोकादायक ठरतील आणि अपघातांचे प्रमाण वाढेल अशी भिती गडकरी यांनी व्यक्त केली आहे. कामात अडथळे आणणारी अशी परिस्थिती कायम राहिली तर यापुढे राज्यातील राष्ट्रीय महामार्गांची कामे मंजूर करण्याबाबात विचार करावा लागेल असा इशारा या पत्राद्वारे गडकरी यांनी दिला आहे (Nitin Gadkari has written a letter to Chief Minister Uddhav Thackeray).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी