33 C
Mumbai
Wednesday, April 17, 2024
Homeमहाराष्ट्र“दुसऱ्यांचे घर फोडण्यात शरद पवारांचे आयुष्य गेले, त्यामुळेच…”, भाजपची घणाघाती टीका

“दुसऱ्यांचे घर फोडण्यात शरद पवारांचे आयुष्य गेले, त्यामुळेच…”, भाजपची घणाघाती टीका

शरद पवार गटाचे नवचिन्ह तुतारीचे अनावरण रायगडावर नुकतेच करण्यात आले. त्यावरून भाजपने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून टीका केली आहे. भाजपने म्हटलंय की, “आजपर्यंत त्यांचे आयुष्य दुसऱ्यांचे घर फोडण्यात गेले आहे. त्यामुळे आजपर्यंत त्यांना यांना रायगडावर यायला वेळ नव्हता, अशी घणाघाती टीका भाजपने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर केली आहे. 

“आता निवडणुका जवळ आल्याने आणि बहुतांश सहकारी अजितदादांसोबत गेल्याने शरद पवारांना रायगडाची आठवण आली आहे. सहानुभूती निर्माण करुन मते मिळवण्याकरता या वयात शरद पवार यांना असे उद्योग करावे लागत आहेत. 40 वर्षांत शरद पवार यांना कधीही रायगडाची आठवण झाली नाही. कधीही दुर्ग संवर्धनासाठी शरद पवार यांनी प्रयत्न केले नाहीत, असा आरोप महाराष्ट्र भाजपने केले आहेत. 

…याचं क्रेडिट अजित पवारांना द्यावं लागेल : देवेंद्र फडणवीस

भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शरद पवारांना टोला लगावला आहे. ते म्हणाले की, “शरद पवार 40 वर्षानंतर रायगडावर गेले. मला या गोष्टीचा आनंद आहे. शेवटी छत्रपती शिवरायांच्या चरणी 40 वर्षानंतर अजितदादांमुळे शरद पवारांना रायगडावर जावं लागलं, याचे क्रेडिट अजित पवार यांना द्यावेच लागेल. तुतारी कुठे वाजते कशी वाजते ते आपल्याला भविष्यात देखील दिसेलच”, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लगावला आहे. 

आता शरद पवारांना छत्रपतींचा रायगड आठवला : राज ठाकरे

“तुतारी मिळाली तर फुंका आता. छत्रपतींचं कधीही नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवला. मी मागेही यावर बोललो आहे. फुले-शाहू-आंबेडकर नाव घेत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव का घेत नाहीत? असा प्रश्न मी त्यांना मागेही विचारला होता. छत्रपतींचं नाव घेतल्यावर मुस्लिमांची मते जातात, अशा संभ्रमावस्थेत त्यांनी इतकी वर्ष काढली आणि आता त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण झाली”, असे परखड मत राज ठाकरेंनीही मांडलं आहे.

तुतारीतून आवाज निघेल की, हवा हे पहावं लागेल : सुजय विखे पाटील

तुतारी चिन्हावरून टोला लगावताना सुजय विखे पाटील यांनीही टीका केली होती, ते म्हणाले होते की, “मशाली घ्या तुतारी वाजवा. हवे तर त्यांना नव्या तुतारी घेऊन देऊ. मात्र, आता तुतारी वाजेल की हवा निघेल हे पाहावे लागेल. चिन्ह देणे हा निवडणूक आयोगाचा निर्णय होता. आयोगाने चिन्ह वाटप केलेले आहे पण अजूनही दुसऱ्या चिन्हावर आक्षेप घेतले गेले आहे. मशालीवर आक्षेप घेण्यात आला आहे, त्यामुळे जो पर्यंत बॅलेटवर चिन्ह येत नाही, तोपर्यंत चिन्हावर चर्चा करण्यात काय अर्थ नाही”, अशी प्रतिक्रिया सुजय विखे पाटील यांनी दिली आहे.

हेही वाचा : “महाराष्ट्राचं राजकारण अजून गाळात जाईल”, राज ठाकरेंचं परखड मत

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी