32 C
Mumbai
Tuesday, June 18, 2024
Homeमहाराष्ट्रकेंद्राने राज्याला ३-४ कोटी डोस एकत्र उपलब्ध करून द्यावेत : रोहित पवार

केंद्राने राज्याला ३-४ कोटी डोस एकत्र उपलब्ध करून द्यावेत : रोहित पवार

टीम लय भारी

मुंबई :- महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. देशात सलग तीन दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येने एक लाखांचा टप्पा ओलांडला आहे. राज्यात कोरोना लसींचा केवळ दोन दिवस पुरेल, इतकाच साठा उपलब्ध आहे. त्यामुळे या मुद्द्यावरुन केंद्र विरुद्ध राज्य असा संघर्ष पुन्हा तापण्याची शक्यता आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह अनेकांनी केंद्र सरकारला लसींचा पुरवठा करण्याबाबत विनंती केली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना सल्ला दिला आहे.

राज्यात कोरोना लसींचा केवळ दोन दिवस पुरेल, इतकाच साठा उपलब्ध आहे. यावरून राज्य आणि सरकार पुन्हा एकमेकांविरोधात ठाकल्याचे पाहायला मिळत आहे. रोहित पवार यांनी यातून मार्ग काढण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन जाधव यांना सल्ला दिला आहे. राज्याला एकत्रच ३-४ कोटी डोस उपलब्ध करून केंद्राने हा प्रश्न निकाली काढावा, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

सरकारने वस्तुस्थिती मांडली

कोरोनाबाबत केंद्राच्या मार्गदर्शक तत्वानुसारच सरकार निर्णय घेत असताना केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे वक्तव्य ऐकून आश्चर्य वाटले. लसीसंदर्भात राज्यातील विरोधक शांत असले तरी सरकारने वस्तुस्थिती मांडली आहे. त्यामुळे राज्याला एकत्रच ३-४ कोटी डोस उपलब्ध करून केंद्राने हा प्रश्न निकाली काढावा, असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.

लसींचा पूर्ण साठा पाठवून द्यावा

दुसऱ्या एका ट्विटमध्ये रोहित पवार म्हणाले की, नाहीतरी सध्या काही राज्यात निवडणूक सुरू असल्याने त्या संपेपर्यंत तिथला कोरोना शांत बसला आहे. त्यामुळे तिथे लसीची तेवढी गरज नाही. तोपर्यंत तरी देशाचा मोठा आर्थिक डोलारा सांभाळत असलेल्या महाराष्ट्राला केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन जाधव साहेबांनी लसींचा पूर्ण साठा पाठवून द्यावा, अशी विनंती रोहित पवार यांनी केली आहे.

देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण असतानाही लसीच्या पुरवठ्याबाबत दुजाभाव का कशासाठी? राज्यात आज केवळ साडेसात लाख लसीचे डोस पुरवण्यात आले. पण इतर राज्यांना ४० लाखांहून अधिक डोस देण्यात आले आहेत. यात राजकारणाचा मुद्दा नाही. पण ज्या पद्धतीने पुरवठा केला जात आहे ते योग्य नाही. दर आठवड्याला आम्हाला ४० लाख डोसेस द्या त्यापेक्षा अधिक आमची काहीच मागणी नाही, असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी