28 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रChandrakant Khaire : 'ठाकरे परिवाराच्या विरोधात बोलाल, तर याद राखा'

Chandrakant Khaire : ‘ठाकरे परिवाराच्या विरोधात बोलाल, तर याद राखा’

हिंदू गर्व गर्जना मेळाव्यात भूमरेंनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यावर सडकून टीका केली होती, त्यामुळे शिवसेनेच्या गोटाच एकच खळबळ पाहायला मिळाली होती. परंतु शिवसेनेची पाठराखण करण्यासाठी आणि आपल्या बचावासाठी चंद्रकांत खैरे यांनी संदिपान भूमरेंवर जोरदार हल्लाबोल चढवित प्रत्युत्तर दिले आहे.

राज्यातील शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील वाद शमण्याची चिन्हे दिसत नाहीत. रोजच कोणीतरी काहीतरी वक्तव्ये करीत वादासाठी आमंत्रण देत असतात आणि बराच काळ तो एकच मुद्दा चघळत एकमेकांवर शाब्दिक वार करत अंगावर धावून जात असतात. अनेक दिवसांपासून चाललेल्या या खेळात आता संदिपान भूमरे आणि चंद्रकांत खैरे यांनी एकमेकांवर उधळलेल्या प्रखर शब्दसुमनांची सध्या चर्चा रंगून लागली आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचा हिंदू गर्व गर्जना मेळाव्यात भूमरेंनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यावर सडकून टीका केली होती, त्यामुळे शिवसेनेच्या गोटाच एकच खळबळ पाहायला मिळाली होती. परंतु शिवसेनेची पाठराखण करण्यासाठी आणि आपल्या बचावासाठी चंद्रकांत खैरे यांनी संदिपान भूमरेंवर जोरदार हल्लाबोल चढवित प्रत्युत्तर दिले आहे.

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी शनिवारी माध्यमांशी संवाद साधला आणि त्यावेळी त्यांनी संदिपान भूमरे यांनी केलेल्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी बोलताना खैरे म्हणाले, भुमरे यांनी माझ्याबद्दल बोलावे. मात्र, ठाकरे कुटुंबाबद्दल ते बोलले, तर आम्ही सहन करणार नाही. ठाकरे परिवाराच्या विरोधात बोलाल, तर याद राखा आता मी मैदानात उतरलो आहे, असे म्हणून चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेची बाजू भक्कम असल्याचे सांगितले.

हे सुद्धा वाचा..

Pune Bridge : पुणेकरांची कोंडी करणारा पूल क्षणार्धात उद्धवस्त, वाचा नेमकं काय घडलं…

Dharavi Redevelopment: धारावीच्या पुर्नविकास करण्यासाठी महाराष्ट्र सरकार आंतरराष्ट्रीय कंपन्याकडून निविदा मागविणार

Congress President Election: मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांच्यामध्ये होणार काँग्रेस अध्यक्षपदाची थेट लढत

पुढे चंद्रकांत खैरे म्हणाले, भुमरे यांनी त्यांच्या मतदारसंघात कोणालाच मोठे होऊ दिले नाही. भाऊ, भावजय, मुलाला त्यांनी राजकारणातील महत्त्वाची पदे दिली. भावाच्या मुलालत्ही सरपंच केले. भुमरे यांच्याकडे काहीच नव्हते, आता त्यांच्याकडे पाचशे एकर जमीन आहे. ती कोठून आली?’ असे म्हणून स्वतःचा पाय फाटकात असणाऱ्या भूमरेंना चंद्रकांत खैरेंनी त्यांच्याच भाषेत फटकारले आहे.

यावेळी बोलताना खैरे म्हणाले, औरंगाबादच्या सभेसाठी एकनाथ शिंदे यांच्याकडून वीस लाख रुपये घेतल्याचा आरोप भूमरेंनी केली परंतु मी शिंदेंकडून वीस लाख रुपये कशासाठी घेऊ? आता मी मैदानात उतरलो आहे, जे व्हायचे ते होऊन जाऊ द्या असे म्हणूम आपण समर्थ असल्याचे म्हणत त्यांनी येणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी दंड थोपटले आहेत. त्यामुळे या उत्तराने संदिपान भूमरेंचे समाधान होणार की आणखी समोरून वार होणार हे पाहणे ओत्सुक्याचे ठरणार आहे.

दरम्यान, शुक्रवारी औरंगाबादेत शिवसेनेच्या शिंदे गटाचा हिंदू गर्व गर्जना मेळावा पार पडला. या मेळाव्याच्या वेळी संदिपान भूमरेंनी शिवसेनेतील ठाकरे गटाला चांगलेच फैलावर घेत त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता त्यामुळे पुन्हा शिवसेनेकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. कधीकाळी एकत्र शिवसेनेत नांदणाऱ्या या नेत्यांचे आता वेगळेच रुप जनसामान्यांना पाहायला मिळत आहे, त्यामुळे नेमकं खरं काय असा संभ्रम दिवसेंदिवस गडद होत चालला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी