28 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रPune Bridge : पुणेकरांची कोंडी करणारा पूल क्षणार्धात उद्धवस्त, वाचा नेमकं काय...

Pune Bridge : पुणेकरांची कोंडी करणारा पूल क्षणार्धात उद्धवस्त, वाचा नेमकं काय घडलं…

वाहतूक कोंडीसाठी कायम मुख्य कारण बनलेला चांदणी चौकातला पूल काल अखेर मध्यरात्रीच्या सुमारास पाडण्यात आला. पुल पाडण्यासाठी तब्बल 1 हजार 300 छिद्र पाडून 600 किलो स्फोटकं लावण्यात आली होती.

कारण कोणतेही असले तरीही पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सध्या जटील बनत चालला आहे परंतु आता या समस्येपासून पुणेकरांना काही अंशी सुटका मिळणार आहे. वाहतूक कोंडीसाठी कायम मुख्य कारण बनलेला चांदणी चौकातला पूल काल अखेर मध्यरात्रीच्या सुमारास पाडण्यात आला. पुल पाडण्यासाठी तब्बल 1 हजार 300 छिद्र पाडून 600 किलो स्फोटकं लावण्यात आली होती. सारी जय्यत तयारी करून, खबरदारी घेऊन हा पूल पाडण्यात आला. पूल पाडल्यानंतर पुलाजवळ बराच वेळ धुराचे केवळ लोटच दिसून येत होते. बऱ्याच वेळानंतर धुराचे लोट कमी झाले आणि पूल पडल्याचे दिसू लागले, दरम्यान आता ढिगारे हटवण्याचे काम सुरू असल्याने अद्याप येथील वाहतूक सुरू करण्यात आलेली नाही.

हाती आलेल्या माहितीनुसार, काल मध्यरात्रीच्या सुमारास रात्री 1 वाजून 7 मिनिटांनी वाहतुकीस त्रासदायक ठरणारा चांदणी चौकातील पूल पाडण्यात आला. सदर पूल पाडण्यासाठी तब्बल 1 हजार 300 छिद्र पाडून 600 किलो स्फोटकं लावण्यात आली होती. पुर्वनियोजित अशी सगळी जय्यत तयारी आणि खबरदारी घेऊन रात्री एकनंतर काऊंटडाऊन सुरू झाले आणि बघता बघता क्षणार्धात हा पूल जमीनदोस्त झाला. पूल जमीनदोस्त झाल्याने पुलाच्या आसपास केवळ आणि केवळ धुळीचे लोट दिसून येत होते परंतु बऱ्याच वेळानंतर धुळ कमी झाली आणि पुल पडल्याचे चित्र समोर आले.

हे सुद्धा वाचा…

Dharavi Redevelopment: धारावीच्या पुर्नविकास करण्यासाठी महाराष्ट्र सरकार आंतरराष्ट्रीय कंपन्याकडून निविदा मागविणार

Congress President Election: मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांच्यामध्ये होणार काँग्रेस अध्यक्षपदाची थेट लढत

Devendra Fadnavis: गडचिरोली पोलिसांचे वेतन दोन दिवसांमध्ये वाढणार – पालकमंत्री देवेंद्र फडणवीस

पूल पाडल्यानंतर तेथील ढिगारे हटवण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे. तेथील राडारोडा हटवण्याचे काम सहा तासांपासून सुरू असून जेसीबी आणि पोकलेनच्या मदतीने हे काम करण्यात येत आहे. या कामी स्वतः जिल्हाधिकारी राजेश देशमुख लक्ष ठेऊन आहेत. सदर ढिगारा हटवण्याचे काम अजून काही वेळ चालून राहणार असून येथील वाहतूक अद्याप बंदच ठेवण्यात आलेली आहे. हे काम पुर्ण होईपर्यंत पर्यायी व्यवस्था सुद्धा करून देण्यात आलेली आहे, त्यामुळे त्या मार्गे प्रवास करणाऱ्यांनी वाहतुकीत जे बदल करण्यात आलेले आहेत ते जाणून घेणे गरजेचे असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आलेले आहे.

मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील मुंबईकडून येणारी जड वाहतूक ही ऊर्से टोलनाका येथेच थांबवली जाणार आहे, तर साताऱ्याकडून येणारी जड वाहतूक ही खेड शिवापूर टोलनाक्याजवळ थांबवण्यात येणार आहे अशल्याचे सांगण्यात आलेले आहे. दरम्यान मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील शिंदेवाडी ते ऊर्से टोलनाका या दरम्यान दोन्ही बाजूने सर्व प्रकारच्या जड वाहनांच्या वाहतुकीस बंदी करण्यात आली असून कोणत्याच जड वाहनास येथून जाण्यात बंदी घालण्यात आलेली आहे. तसेच मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील डुक्कर खिंड ते पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीतील घोडावत चौक या दरम्यान दोन्ही बाजूने सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीस बंदी राहणार आहे.

त्यामुळे सदर वाहतुक बदल लक्षात घेता वाहनधारकांनी या कालावधीत प्रवास करावा असे सुद्दा सांगण्यात आले आहे. कायम वाहतुक कोंडीसाठी अडचण ठरणारा चांदणी चौकातील पूल आता जमिनदोस्त झाला आहे त्यामुळे आता त्यावर पर्यायी व्यवस्था काय हे पाहणे आता निश्चितच महत्त्वाचे ठरणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी