30 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रबारसू रिफायनरी प्रकरण: आम्ही शेतकरी आहोत दहशतवादी नाही; शेकडो ग्रामस्थांचा आक्रोश

बारसू रिफायनरी प्रकरण: आम्ही शेतकरी आहोत दहशतवादी नाही; शेकडो ग्रामस्थांचा आक्रोश

रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू रिफायनरी प्रकल्पाचे सर्वेक्षण आजपासून सुरु होणार आहे. मात्र या सर्वेक्षणाला स्थानिक ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला आहे. यावेळी राज्य सरकारविरोधात स्थानिक ग्रामस्थांनी लाँगमार्च काढला. उन्हाचे चटके बसत असताना शेकडो महिलांसह सर्व ग्रामस्थांनी लाँगमार्च काढत प्रकल्पाला तीव्र विरोध केला. यामुळे हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गावकऱ्यांच्या विरोध पाहता प्रशासनाने प्रकल्पाच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. “अखेरच्या श्वासापर्यंत आम्ही लढत राहू पण मागे हटणार नाही. इंग्रज सरकार बरं होतं पण अशी म्हणण्याची वेळ शिंदे फडणवीस सरकारने आणली आहे, अशी संतापाची भावनाही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. आम्ही शेतकरी आहोत दहशतवादी नाही की आम्हाला रात्री अपरात्री पोलीस नोटीसा देत आहेत. मी एक सामान्य शेतकरी आहे. अखेरच्या श्वासापर्यंत आमचा या प्रकल्पाला विरोध आहे. इंग्रज सरकार, मुघल तरी बरे होते पण शिंदे-फडणवीस सरकारची ती पण लायकी नाही, अशा कठोर शब्दांत ग्रामस्थांनी राज्य सरकारला फटकारलं.

गेल्या दोन वर्षांपासून या प्रकल्पाला गावकऱ्यांचा विरोध असतानाही राज्य सरकार या प्रकल्पासाठी प्रयत्न करत आहे. खासदारांनी या संदर्भात स्थानिकांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते. पण आजपर्यंत एकदाही त्यांनी ग्रामस्थांची भेट घेतलेली नाही, अशी खंत एका ग्रामस्थाने व्यक्त केली. त्याचप्रमाणे, शेतकरी आहोत ही जमीन फक्त कसण्यासाठी हवी. यातून नोकऱ्या मिळाल्या तरी हा प्रकल्प नकोय, आमची मुलं कमवून खातील, असही काही आंदोलक महिलांनी म्हटलं आहे.

 

यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत राज्य सरकारच्या निर्णयाचा निषेध केला आहे. स्थानिकांना विश्वासात घेऊनच कोणताही प्रकल्प उभारणं आवश्यक असतं. पण हे सरकार बोलतं एक आणि करतं भलतंच, असं वारंवार दिसतंय.. आजही बारसू ग्रामस्थांचा रिफायनरीला कडाडून विरोध असतानाही सरकार पोलिसी बळाचा वापर करून हा प्रकल्प त्यांच्यावर लादण्याचा प्रयत्न करतंय. हे योग्य नाही. एकीकडे सामान्यांचं सरकार आहे, असं म्हणायचं आणि दुसरीकडं याच सामान्यांना पोलिसांचा धाक दाखवून त्यांच्यावर दडपशाही करायची, हा कुठला न्याय?, असा संतप्त सवाल रोहित यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा:

रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या पत्रकाराची राजापुरात हत्या ; पोलिसांनी आरोपी आंबेरकरच्या मुसक्या आवळल्या

उद्धव ठाकरेंचे नाणार रिफायनरीबाबत मोठं विधान

रोहित पवार म्हणाले, आपलं राज्य मागं पडत असल्याचं दुःख होतंय

Maharashtra Refinery Case, We Are Farmers Not Terrorists; Outcry of the villagers, Refinery Project, ratnagiri, Barsu, Barsu Refinery Case

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी