38 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeमुंबईहिंदुस्थानचा पुत्र, पाकिस्तानी लेखक तारिक फतेह यांची प्राणज्योत मालवली

हिंदुस्थानचा पुत्र, पाकिस्तानी लेखक तारिक फतेह यांची प्राणज्योत मालवली

पाकिस्तानी वंशाचे कॅनेडियन उदारमतवादी पत्रकार आणि लेखक तारेक फतेह यांचे 24 एप्रिल रोजी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. तारिक फतेह यांची मुलगी नताशाने ट्विट करून या वृत्ताला दुजोरा दिला आहे. “पंजाबचा सिंह, भारताचा पुत्र, कॅनडाचा प्रेमी, सत्याचा वक्ता, न्यायासाठी लढणारा आवाज, दीन-दलित दुबळे अत्याचारित लोकांचा आवाज. त्यांची क्रांती त्यांना ओळखणाऱ्या आणि प्रेम करणाऱ्या सर्वांसोबत कायम राहील, अशा आशयात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

तारिक फतेह स्वत:ला भारतीय असल्याचे म्हणायचे. भारत पाकिस्तानच्या धार्मिक कट्टरतेचा ते विरोध करायचे. ते भारतीय संस्कृतीचं कौतुक करायचे. तसेच भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश यांना एकत्र जोडण्याचे विचार मांडायचे. फतेह यांना हिंदी, इंग्रजी, उर्दू, पंजाबी आणि अरबी भाषेचं ज्ञान होतं. त्यांना त्या भाषा अवगत होत्या. तसेच त्यांना मानवी हक्कांचे कार्यकर्तेदेखील मानलं जायचं. ते अनेकदा भारतीय टीव्ही चॅनल्सच्या चर्चासत्रांमध्ये सहभागी होताना दिसायचे. तसेच ते पाकिस्तानातील बलुचिस्तानात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांचे समर्थन करायचे. तसेच ते पाकिस्तानात घडणाऱ्या अनेक घडामोडींवर रोखठोक मत मांडायचे.

नहीं रहे पाकिस्तानी मूल के मशहूर लेखक तारिक फतेह, बेटी के ट्वीट पर लगा श्रद्धांजलियों का

तारिक फतेह यांचा जन्म 1949 साली पाकिस्तानमध्ये झाला आणि त्यानंतर 1980 च्या दशकाच्या सुरुवातीला त्यांनी कॅनडाला प्रस्थान केले. कॅनेडियन-आधारित लेखक इस्लाम आणि दहशतवादावरील त्यांच्या स्पष्ट विधानांसाठी प्रसिद्ध होते. फतेह यांनी अनेक वेळा पाकिस्तानवर टीका करताना भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला पाठिंबा दिला होता. त्यांनी कॅनडामध्ये राजकीय कार्यकर्ते, पत्रकार आणि टेलिव्हिजन होस्ट म्हणून काम केले आहे आणि अनेक पुस्तके लिहिली आहेत. तसेच रेडिओवरही त्यांनी काम केलं असून त्यांचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

Tarek Fatah, son of Hindustan, Pakistani writer, Tarek Fatah passed away, Tarek Fatah : son of Hindustan, Pakistani writer Tarek Fatah passed away

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी