35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रविजय वडेट्टीवारांचा भाजपला खोचक टोला

विजय वडेट्टीवारांचा भाजपला खोचक टोला

टीम लय भारी

मुंबई :- बीड जिल्ह्यातुन भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यासह पदाधिकारी आणि मुंडे समर्थक राजीनामे घेऊन मुंबईला आले. नाराज असलेल्या सर्व मुंडे समर्थक आणि पदाधिकाऱ्यांशी आज भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी संवाद साधला. यावेळी कौरव, पांडवाच्या युद्धाचा उल्लेख करत पंकजा यांनी पक्षांतर्गत राजकारणावर बोट ठेवले. या वक्तव्यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपला खोचक टोला लगावला आहे (Congress leader Vijay Vadettiwar slammed the BJP).

पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर विजय वडेट्टीवार म्हणाले की, कौरव कोण, पांडव कोण हे त्यांचे त्यांनीच ठरवावे. त्यांची सेना, त्यांचेच कौरव, त्यांचेच पांडव, अंगणही त्यांचेच आणि महाभारतही तिकडचेच, ते त्यांनाच लखलाभ’, अशा शब्दात वडेट्टीवार यांनी पंकजा मुंडे यांच्यासह भाजप नेत्यांना टोला लगावला आहे.

तुमच्या राजीनाम्यावर मला स्वार व्हायचे आहे, पंकजा मुडेंचा भाजपला अप्रत्यक्ष इशारा

पंकजा मुंडे घेणार नाराज समर्थक आणि पदाधिकाऱ्यांची भेट

पंकजा मुंडेंनी साधला समर्थकांशी संवाद

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तार यादीतुन बीडच्या खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे यांचे नाव डावलण्यात आले. त्यामुळे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यासह पदाधिकारी आणि मुंडे समर्थक राजीनामे घेऊन मुंबईला आले. आज भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला (BJP leader Pankaja Munde interacted with the office bearers).

Congress leader Vijay Vadettiwar slammed the BJP
विजय वडेट्टीवार

जामखेडमध्ये भाजपच्या 40 पदाधिकाऱ्यांनी दिले तडकाफडकी राजीनामे

Mumbai: Vijay Wadettiwar rues not getting revenue dept; Thorat asks him to be patient

पंकजा मुंडेंनी राजीनामे फेटाळले

पंकजा मुंडेंच्या वरळीतील निवासस्थानी मोठ्या प्रमाणात समर्थकांनी गर्दी केली होती. त्यावेळी पंकजा मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना, समर्थकांना समजावत म्हणाल्या राजीनामे देऊ नका, असा आदेश दिला गेला आहे. त्यामुळे केंद्रीय नेतृत्वावर विश्वास ठेवा. मी एवढचे सांगेल की तुमचे राजीनामे मी स्वीकारणार नाही. असे म्हणत पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांचे राजीनामे फेटाळले आहेत.

पंकजा मुंडेंनी काढली समर्थकांची समजूत

धर्मयुद्धात पाच पांडव जिंकले. त्यांनी फक्त सात गावं मागितली होती. पण सुईच्या टोकाएवढीही जागा देणार नसल्याचे कौरव म्हणाले. त्यानंतरही पांडव जिंकले. या धर्मयुद्धात पांडव का जिंकले? कारण त्यांच्याकडे कृष्णाचे सारथ्य होते. त्यांच्याविरोधात जे लढत होते, त्यांच्या मनातही पांडवांच्या मनात प्रेम होते. म्हणून पांडव जिंकले. काळ कधीच कुणासाठी थांबत नाही. मी दु:खी नाही. मला काही मिळाले नाही या चिल्लर गोष्टींवर मी जात नाही. मीही पांडव आहे. आम्हीही योद्धे आहोत. मीही धर्म युद्ध टाळण्याचा प्रयत्न करत आहे. जोपर्यंत शक्य आहे, तोपर्यंत मी धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न करत आहे. असे म्हणत त्यांनी सर्व मुंडे समर्थक आणि पदाधिकाऱ्यांची समजूत काढली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी