32 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रCoronavirus : कोरोनाचा कहर, मृत्यूंचा आकडा 1 लाख; तर 16 लाख जणांना...

Coronavirus : कोरोनाचा कहर, मृत्यूंचा आकडा 1 लाख; तर 16 लाख जणांना लागण

टीम लय भारी

मुंबई : जगभरात ‘कोरोना’ने ( Coronavirus ) थैमान घातले आहे. या आजाराने मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा आता एक लाखाच्या पुढे गेला आहे. ताज्या आकडेवारीनुसार जगभरात १ लाख ३७१ जणांचे मृत्यू झाले आहेत.  

कोरोनाची ( Coronavirus ) लागण झालेले तब्बल १६ लाख ४८ हजार रूग्ण आहेत. त्यापैकी ३ लाख ६९ जण बरे झाले आहेत.

‘कोरोना’ची ( Coronavirus ) लागण झालेले सर्वाधिक रूग्ण अमेरिकेत आहेत. तिथे ४ लाख ७८ हजार जणांना लागण झाली आहे, तर जवळपास १८ जणांचा मृत्यू झाला आहे. दुसऱ्या क्रमांकावर स्पेन आहे. तिथे १ लाख ५७ हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर १६ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या इटलीमध्ये १ लाख ४७ हजार जणांना लागण झाली असून १८ हजार ९०० जणांचा मृत्यू झाला आहे.

जर्मनीमध्ये १ लाख १९ हजार जणांना ( Coronavirus ) लागण झाली असून २,६०७ जणांचा मृत्यू झाला आहे. फ्रान्समध्ये १ लाख १७ हजार जणांना लागण झाली आहे. त्यापैकी १२, २१० जणांचे मृत्यू झाले आहेत. चीनमध्ये ८१ हजार जणांना लागण झाली असून ३,३३६ जणांचा मृत्यू झाला आहे.

ब्रिटनमध्ये ७०,२७२ जणांना लागण झाली असून त्यापैकी ८,९५८ जणांचा मृत्यू झाला आहे. इराणमध्ये ६८ हजार जणांना लागण झाली आहे. त्यापैकी ४२३२ जणांचा मृत्यू झाला आहे.

सर्वाधिक मृत्यू इटलीमध्ये झाले आहेत. त्या खालोखाल अमेरिका आणि स्पेनचा समावेश आहे. जर्मनीमध्ये लागण झालेल्या रूग्णांचे प्रमाण जास्त आहे. पण मृत्यूंचे प्रमाण फारच कमी आहे. जर्मन सरकारने ‘कोरोना’वर ( Coronavirus ) मात करण्यासाठी वैद्यकीय उपाययोजना चांगल्या पद्धतीने राबविल्या आहेत. त्यामुळेच हे शक्य झाल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, भारतात ७,३४७ जणांना ‘कोरोना’ची लागण झाली आहे. त्यापैकी २२९ जणांचा मृत्यू झाला आहे.

हे सुद्धा वाचा

कोरोना : जामखेड शहर हॉटस्पॉट केंद्र जाहीर

कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी ‘अहिल्या आरोग्य हेल्पलाइन’ची मोफत सेवा!

जगातील कोरोनाची आकडेवारी

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी