30 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रमाझी वसुंधरा अभियानांतर्गत सायकल परेडला भंडारवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

माझी वसुंधरा अभियानांतर्गत सायकल परेडला भंडारवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

टीम लय भारी

भंडारा : राष्ट्रीय स्वच्छ वायू उपक्रम व पर्यावरण विभागाने जाहीर केलेल्या माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून जिल्हा अधिकारी कार्यालय व नगरपालिका प्रशासनाच्या संयुक्त समन्वयाने “माझी वसुंधरा सायकल राईड’ आयोजित करण्यात आली. पर्यावरण संवर्धनाच्या प्रबोधनासाठी आज (२९ मार्च) सकाळी ७ वाजता भांडारात सायकलप्रेमी एकत्रित येत सायकलस्वारी केली. विक्रमी सायकल परेड साठी २९६० सायकल प्रेमींनी नोंदणी केली असून, लिम्काबुक मध्ये नोंदणीसाठी प्रशाशनाने प्रयत्न करत आहे. (Cycle parade in bhandara)

जिल्हातील खासदार, आमदार व लोकप्रतिनिधिंच्या उपस्तिथीत हा परेडला सुरुवात झाली. परेडसाठी प्रशासनाची जयंत तयारी सुरु होती. सहभागी नागरिकांनी रेल्वे ग्राउंड मैदानात वेळेवर उपस्तिथ राहण्याचे आव्हान जिल्हाअधिकारी संदीप कदम यांनी केले. ऑनलाईन लिंक व क्युआर कोड द्वारे नोंदणी प्रक्रिया चालू होती. आज सकाळ पर्यत नोंदणीला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद होता. अखेर नोंदणी प्रतिक्रिया थांवण्यात आली अशी माहिती सह आयुक्त चंदन पाटील यांनी दिली. मात्र ईच्छुकांसाठी मैदानावर वेळेवर सहभाग नोंदणीची सोया करण्यात आली.(Cycle parade in bhandara)

या परेडमध्ये प्रसिध्द नागपूरचे सायकलपटू अमित समर्थ, सुनिता धोटे हे ही सहभागी होणार आहेत. परेड दरम्यान सायकलमध्ये बिघाड झाल्यास तीन रिकव्हरी व्हॅनसुध्दा ठेवण्यात आल्या आहेत. तसेच 4 वैद्यकीय पथकेही सेवेत असणार आहेत. परेडव्दारे 7 किलोमीटर अंतर मार्गक्रमण करत निसर्ग संवर्धनाचा संदेश देण्याचा हा अनोखाप्रयत्न असणार आहे. या दरम्यान उपस्थित सायकलस्वार हे भारतीय ध्वज रंगावलीच्या टोप्या परिधान करून विशाल मानव श्रृंखलेच्या माध्यमातून तिरंगा साकारणार आहे. भंडाऱ्याच्या इतिहासात आतापर्यतच्या सर्वात मोठ्या सायकल(Cycle parade in bhandara) परेडचे आयोजन असणार आहे.

हे सुध्दा वाचा :

सोलापुरात माझी वसुंधरा सायकल राईडला प्रतिसाद

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी