33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रपीडब्ल्यूडीचा प्रताप : सरकारी महाविद्यालयात टीचभर काम, हातभर बिल !

पीडब्ल्यूडीचा प्रताप : सरकारी महाविद्यालयात टीचभर काम, हातभर बिल !

टीम लय भारी

मुंबई : जोगेश्वरी (Jogeshwari) येथे ईस्माईल युसूफ हे सरकारी मालकीचे महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात ‘सार्वजनिक बांधकाम विभागा’ने आपल्या रूढ परंपरेनुसार यथेच्छ बोगस कामे केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. (Pwd set many corruption practices in maharashtra)

या सरकारी महाविद्यालयात इमारत दुरूस्ती काम, अंतर्गत सजावट, रंगकाम, पेव्हर ब्लॉक, पाय वाटा, दगडी संरक्षक भिंत अशी विविध प्रकारची कामे सुरू आहेत. अंदाजे चारेक कोटी रुपयांची ही कामे असू शकतील. परंतु पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी अंदाजे आठ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची बिले मंजूर करून घेतली आहेत. त्यातील बराच निधी पदरात सुद्धा पाडून घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

पीडब्ल्यूडीचे उप अभियंता नितीन पगारे व शाखा अभियंता संदेश लोणारे यांच्या कार्यकक्षेत ही कामे सुरू आहेत. या दोघांनीच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मुक संमतीने हा घोटाळा केल्याचे सूत्रांनी सांगितले.

प्रत्यक्षात झालेली कामे आणि बिलांवर / एमबी पुस्तिकेत नोंदवलेली कामे यांत जमीन अस्मानचा फरक आहे. वास्तवात केलेल्या कामांची संख्या फार कमी आहे. परंतु कागदावर कामांची संख्या व रक्कम फुगविण्यात आल्याचे या सूत्रांनी ‘लय भारी’शी बोलताना सांगितले.
याबाबत उप अभियंता नितीन पगारे यांच्याशी संपर्क साधला असता, असा काहीही प्रकार झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.


हे सुद्धा वाचा : 

PWD improves shutter operation at Mullaperiyar dam

पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्याकडून कंत्राटदारांची छळवणूक!

पीडब्ल्यूडीमध्ये ‘दिवाळी’, बोगस कामे दाखवून करोडो रुपये हडपले; अधिकारी उकळताहेत ३० टक्के रक्कम

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी