30 C
Mumbai
Monday, May 15, 2023
घरमुंबईउत्तराखण्डमधील दुर्गम भागातील क्षयग्रस्त रुग्णाला ड्रोनमार्फत औषधांची एअर डिलिव्हरी

उत्तराखण्डमधील दुर्गम भागातील क्षयग्रस्त रुग्णाला ड्रोनमार्फत औषधांची एअर डिलिव्हरी

उत्तराखंडमधील दऱ्याखोऱ्यांनी वेढलेल्या दुर्गम भागांमधील क्षयग्रस्त रुग्णाला ड्रोनच्या माध्यमातून औषधे पोचती करण्यात आली आहेत. गढवाल जिल्ह्यातील तेहरी येथील आरोग्य केंद्रात ड्रोनमार्फत औषधांची डिलिव्हरी करण्यात आली. ऋषिकेश येथील ‘ऑल इंडिया इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ या ठिकाणाहून ड्रोनने उड्डाण केले. ४० किलोमीटरचे अंतर ३० मिनिटांमध्ये या ड्रोनने पार केले. रस्त्याच्या मार्गाने ही औषधे पोहोचवण्यासाठी तब्बल दोन तासांचा अवधी लागतो. पण द्रोणने या औषधांची डिलिव्हरी केल्यामुळे दीड तासांचा वेळ वाचला आहे. या तंत्रज्ञानामुळे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाचा जीव वाचविण्यास मदत होणार आहे. (Air delivery of medicines through drones to tuberculosis patients in remote areas of Uttarakhand)

ऋषिकेशहून औषधे आणि इतर साहित्य इच्छित स्थळी पोहोचवण्यासाठी क्वाडकॉप्टर टेस्ट फ्लाईट घेण्यात आली. तसेच आरोग्य केंद्रातून क्षयग्रस्त रुग्णांच्या रक्ताच्या नमुन्याची वाहतूकही या ड्रोनमार्फत करण्यात आली. जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळा तंत्रज्ञ दमयंती दरबाळ यांनी सांगितले की, “रिषीकेशहून २८ मिनिटांमध्ये आरोग्य केंद्राच्या क्षयग्रस्त रुग्णांसाठी औषधे आणि रक्ताचे नमुने आणण्यात आले. आम्ही आमची औषधे आणि काही नमुने या ड्रोनमार्फत परत पोठवले. काही वेळा आपत्कालीन परिस्थिती उद्भवते. अशा वेळी औषधांची त्वरित गरज भासते. या तंत्रज्ञानामुळे त्यासाठी मदत होणार आहे.”

उत्तराखंडच्या दुर्गम भागांत राहणाऱ्या रुग्णांना औषधे पोहोचविण्यास या तंत्रज्ञानामुळे मदत होणार आहे. क्षयग्रस्त रुग्णांना औषधे वेळेत मिळावी तसेच उपचारासाठी दूरच्या ठिकाणी प्रवास करावा लागू नये, यासाठी आम्हाला यंत्रणा उभारायची होती, असे ‘ऑल इंडिया इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्सेस’चे कार्यकारी संचालक डॉ. मिनू सिंग यांनी सांगितले. ड्रोनने उड्डाण केले ही तितकीशी महत्वाची घटना नाही, पण औषधे सुरक्षितपणे रुग्णापर्यंत पोहोचली ही महत्वाची गोष्ट आहे, असे सिंग म्हणाल्या.

हे सुद्धा वाचा

अशोक चव्हाण यांना भाजप प्रवेशाची ऑफर…

मोदींचा मनमानी कारभार : सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला नोटीस

घटनाबाह्य सरकारबाबत घटनापीठाने निर्णय घ्यावा – संजय राऊत

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी