28.4 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रDevendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याच मंत्र्यांना झापले !

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याच मंत्र्यांना झापले !

सत्ताबदलानंतर शिंदे गटातील नेते बेलगाम वक्तव्य करीत आहेत त्याची बाजू सुद्धा मुख्यमंत्री यांना सांभाळावी लागत आहे. राज्यातील वेगवेगळ्या समस्यांना तोंड देत असताना स्वतःच्या गटातील नेते आणखी अडचण वाढवत आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे यांची चांगलीच कोंडी झाली आहे.

राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर एकनाथ शिंदे सरकार जोमाने कामाला लागले आहे. सत्तांतराच्या नाट्यमय घडामोडींनंतर राज्यातील जनता काहीशी निराश झाली परंतु आपले सरकार टिकवण्यासाठी शिंदे गट आणि भाजप आपापल्या परीने युक्त्या लढवू लागले आहेत, वेगवेगळ्या योजनांची बोळवण करीत ते आमिष देऊ लागले आहेत, परिणामी जनतेला सुद्धा धीर आला असून अधिक अपेक्षेने ती या सरकारकडे पाहू लागली आहे. मंत्री महोदयांच्या अशा बेलगाम वागण्यामुळे सरकार पुरते कोंडीत सापडण्याची शक्यता निर्माण झाल्याचे लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांनी झापले आहे. कोणताही सारासार विचार न करता घोषणा करून नका म्हणून फडणवीसांनी मंत्र्यांचे कान टोचले आहेत.

मंत्री बेलगाम बोलून जातात परंतु त्याचे परिणाम पुढे यंत्रणांना भोगावे लागतात आणि असाच काहीसा प्रकार समोर आल्याने देवेंद्र फडणवीस खिन्न झाले आहेत. या पार्श्वभूमीवर कृषीमंत्री अब्दूल सत्तार यांच्यासह उतावीळ मंत्र्यांना चांगलेच फटकराले आहे. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोणताही सारासार विचार न करता घोषणा करू नका, कोणताही निर्णय परस्पर जाहीर करू नका असे म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना फैलावर घेतले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा यावेळी मंत्र्यांना खडसावले त्यामुळे उतावीळ आणि सत्तालोलूप मंत्री चांगलेच अडचणीत आले आहेत.

हे सुद्धा वाचा…

IPS transfers : IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या लवकरच, नांगरे पाटील यांची उचलबांगडी होणार!

Sonali Phogat Death Case : सोनाली फोगाटचा मृत्युचा तपास आता CBI करणार

Sanjay Dutt :खलनायकाच्या भूमीकेसाठी संजय दत्त यांना 10 कोटींची ऑफर

जेव्हापासून एकनाथ शिंदे सरकार स्थापन झाले तेव्हा पासून स्वतःची प्रतिमा जनतेसमोर आणखी चांंगली करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मंत्री बेलगामपणे काहीही बोलून जनतेला वेगवेगळी आश्वासने देत आहेत, घोषणांचा सुद्धा सपाटा लावला आहे. त्यामुळे बेजार जनता मंत्र्यांच्या या आश्वासनांमुळे सुखावू लागली आहे, परंतु ही आश्वासने पुर्ण करणार कोण आणि कशी असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे. मंत्र्यांची आश्वासने पुर्ण करता करता सरकारी यंत्रणांची दमछाक होणार, संपुर्ण यंत्रणा वेठीस धरली जाणार असल्याचे चित्र हळूहळू दिसू लागले आहे. हे प्रकरण गांभीर्याने लक्षात घेत देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने पावलं उचलली आहे.

केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना राबवण्यात येत आहे. याच धर्तीवर राज्यात सुद्धा राज्यात सुद्धा अशा प्रकारे सन्मान योजना राबवावी, केंद्राच्या योजनेत राज्याला सुद्धा सहभागी करून घ्यावे या विचाराने सरकारी पातळीवर काम सुरू आहे, याबाबत विचार करण्यात येत आहे. केवळ देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या गोटात चाललेला हा विषय माध्यामांसमोर आला आणि एकच गोंधळ उडाला. कुठलीही प्रक्रिया सुरू नसताना अशा पद्धतीने गोपनीय माहिती समोर येणं लज्जास्पद आहे, त्यामुळे फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदे यांनी याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीतच कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी ही माहिती लीक का केली म्हणून धारेवर धरले.

यावर उत्तर देत मंत्री सत्तार म्हणाले, त्यावर निर्णय झाल्याचे म्हणालो नाही, तर विचार सुरू असल्याचे सांगितले असे म्हणून अब्दुल सत्तार यांनी स्वतःचीच पाठराखण केली. दरम्यान सत्ताबदलानंतर शिंदे गटातील नेते बेलगाम वक्तव्य करीत आहेत त्याची बाजू सुद्धा मुख्यमंत्री यांना सांभाळावी लागत आहे. राज्यातील वेगवेगळ्या समस्यांना तोंड देत असताना स्वतःच्या गटातील नेते आणखी अडचण वाढवत आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे यांची चांगलीच कोंडी झाली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी