28 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमंत्रालयIPS transfers : IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या लवकरच, नांगरे पाटील यांची उचलबांगडी होणार!

IPS transfers : IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या लवकरच, नांगरे पाटील यांची उचलबांगडी होणार!

आता प्रमुख IPS अधिकाऱ्यांवरही एकनाथ शिंदे सरकारचा हातोडा पडणार आहे. यात मुंबईचे अपर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि नागपूरचे आयुक्त अमितेश कुमार यांचा समावेश आहे. एकूण 23 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

‘महाविकास आघाडी सरकार’ची अडीच महिन्यांपूर्वी सत्ता गेली. त्यानंतर राज्यात भाजपप्रणीत एकनाथ शिंदे सरकार सत्तेत आले. नव्या सरकारने महत्वाच्या पदांवरील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा लावला आहे. मंत्रालयातील काही सचिव, तसेच राज्यभरातील विविध आयुक्त पदांवरील सनदी अधिकाऱ्यांच्या दर 10 – 15 दिवसांच्या फरकाने बदल्या होत आहेत. आता प्रमुख IPS अधिकाऱ्यांवरही एकनाथ शिंदे सरकारचा हातोडा पडणार आहे. यात मुंबईचे अपर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि नागपूरचे आयुक्त अमितेश कुमार यांचा समावेश आहे. एकूण 23 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

काही अधिकाऱ्यांचा सेवा काळ पूर्ण झालेला आहे. काही अधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे सरकारच्या काळात नियुक्त्या मिळालेल्या होत्या. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याच मर्जीतील अधिकारी असावेत, अशी शिंदे सरकारची इच्छा आहे.
उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखात्याचा कारभार आहे. गृहखाते कसे हाताळायचे याचा दांडगा अनुभव देवेंद्र फडणवीस यांना आहे. मुख्यमंत्री असतानाच्या पाच वर्षांच्या काळात त्यांनी गृहखात्याचा चांगला अनुभव घेतला होता. त्यामुळे या खात्याचे महत्व फडणवीस यांना चांगलेच ठाऊक आहे.

हे सुद्धा वाचा…

Sonali Phogat Death Case : सोनाली फोगाटचा मृत्युचा तपास आता CBI करणार

Sanjay Dutt :खलनायकाच्या भूमीकेसाठी संजय दत्त यांना 10 कोटींची ऑफर

Ponniyin Selvan 1 : ब्रह्मास्त्राच्या यशानंतर ‘पोन्नियन सेल्वन 1’ सिनेमाची जोरदार चर्चा

गृहखात्याच्या माध्यमातून विरोधी पक्षांच्या नेत्यांवर वचक ठेवता येते. विरोधी पक्षातील नेत्यांच्या खबरी गोपणीय पद्धतीने मिळवता येतात. अशा नेत्यांना अडचणीत आणण्याचे सगळे प्रकार गृह खात्याच्या माध्यमातून सहजपणे करता येतात. विविध निवडणुकांमध्येही गृह खात्याच्या माध्यमातून रणनिती आखता येते. त्यासाठी खास मर्जीतील IPS अधिकाऱ्यांची कुमक सोबत असावी लागते. या अनुषंगानेच मोक्याच्या ठिकाणी मर्जीतील IPS अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या जातात.

विश्वास नांगरे पाटील यांच्यावर भाजपची नाराजी

विश्वास नांगरे – पाटील सध्या मुंबई पोलीस दलात अत्यंत महत्वाच्या पदावर आहेत. परंतु त्यांच्यावर भाजपची नाराजी आहे. माजी खासदार किरीट सोमय्या यांनी नांगरे पाटील यांच्या विरोधात केंद्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली होती.
विश्वास नांगरे पाटील हे ‘महाविकास आघाडी’चे माफीया आहेत, असा जाहीर आरोप सोमय्या यांनी केला होता.

वर्षभरापूर्वी किरीट सोमय्या यांनी तत्कालिन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात रान पेटवले होते. ते थेट कोल्हापूरला जाणार होते. त्यावेळी नांगरे पाटील यांनी सोमय्या यांना स्थानबद्ध केले होते. ‘मला सहा तास दरवाजाच्या आता डांबून ठेवल्याचा’ तेव्हा सोमय्या यांनी आरोप केला होता. त्या विरोधात त्यांनी केंद्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार सुद्धा केली होती.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी