29.5 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
HomeमनोरंजनDrug racket busted in Bengaluru: बॉलिवूडनंतर आता दाक्षिणात्य सिनेसृष्टीत ड्रग्जचा शिरकाव! एका...

Drug racket busted in Bengaluru: बॉलिवूडनंतर आता दाक्षिणात्य सिनेसृष्टीत ड्रग्जचा शिरकाव! एका अभिनेत्याला अटक

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील छोट्स पडद्यावर काम करणाऱ्या एका अभिनेत्याला आणि त्याच्या सोबत इतर 2 लोकांना काटक पोलिसांनी ड्रग्ज तस्करीच्या (Drug Racket) प्रकरणात अटक केली आहे. शियाज असे या अभिनेत्याचे नाव आहे. हे लोक आंतरराज्य ड्रग्ज नेटवर्क किंवा अंमली पदार्थांची आंतरराज्य टोळी चालवत असल्याचे सांगण्यात येत आहे.

सुशांत सिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूनंतर बॉलीवूड आणि हिंदी टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक स्टार्सची ड्रग्ज प्रकरणात नावं आली आहेत, त्यापैकी काहींनी तुरुंगाची हवाही खाल्ली. या गंभीर प्रकरणामुळे रिया चक्रवर्ती आणि शाहरुख खानचा (Shah Rukh Khan)  मुलगा आर्यन खानदेखील तुरुंगात गेला होता. त्यानंतर आता हे ड्रग्जचे जाळे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतदेखील (South Film Industry) पसरल्याचे उघडकीस आले आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील छोट्स पडद्यावर काम करणाऱ्या एका अभिनेत्याला आणि त्याच्या सोबत इतर 2 लोकांना काटक पोलिसांनी ड्रग्ज तस्करीच्या (Drug Racket) प्रकरणात अटक केली आहे. शियाज असे या अभिनेत्याचे नाव आहे. हे लोक आंतरराज्य ड्रग्ज नेटवर्क किंवा अंमली पदार्थांची आंतरराज्य टोळी चालवत असल्याचे सांगण्यात येत आहे.

कर्नाटक पोलिसांनी केरळमध्ये एका छोट्या पडद्याच्या अभिनेत्यासह तीन अंमली पदार्थ तस्करांना अटक केली असून त्यांच्याकडून शुक्रवारी (23 सप्टेंबर) 12.50 लाख रुपये किमतीचे 191 ग्रॅम एमडीएमए आणि 2.80 किलो गांजा जप्त केला आहे. शियाज, मोहम्मद शाहिद आणि मंगल थोडी जथिन अशी आरोपींची नावे आहेत. सर्व आरोपी केरळचे रहिवासी आहेत आणि आरोपी शियाज मल्याळम टेलिव्हिजनमध्ये अभिनेता म्हणून काम करायचा.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ड्रग्ज पुरवायचे –

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी स्थानिक नामांकित महाविद्यालयातील विद्यार्थी आणि उच्चभ्रू लोकांना ड्रग्ज विकायचे. दोघांनी मिळून एक आंतरराज्य अमली पदार्थांची टोळी चालवली आणि पोलिसांनी त्यांच्यावर नार्कोटिक्स ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स ऍक्ट (NDPS) 1985 लादला आहे. माहिती मिळाल्यावर, पोलिसांनी दोन आरोपींना एनआयएफटी कॉलेज, बेंगळुरूजवळून अटक केली आणि 101 ग्रॅम MDMA आणि 6 लाख रुपये किमतीचा 2.80 किलो गांजा जप्त केला. दोन्ही आरोपींची चौकशी केल्यानंतर तिसरा आरोपी आग्रा तलावातील सर्व्हिस रोडजवळ अंमली पदार्थ विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर तिसऱ्या आरोपीलाही पोलिसांकडून अटक करण्यात आली.

हे सुद्धा वाचा –

Infosys founder Narayan Murthy: ‘भारताने आर्थिक क्षेत्रात मनमोहन सिंह पंतप्रधान असताना म्हणावी तशी प्रगती केली नाही’

cow shed : मुंबईतील दूरसंचार विभागाच्या दारात गायींचा गोठा

India-Australia T-20 Series – पहिला डाव देवाला देत भारताचे मालिकेत पुनरागमन!

दरम्यान, गेल्या वर्षी जानेवारीमध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने छापेमारी कारवाई करताना एका टॉलिवूड अभिनेत्रीला ड्रग्ज प्रकरणामुळे ताब्यात घेतले होते. या कारवाईत एक अमली पदार्थ तस्करही एनसीबीच्या हाती लागला आहे. विभागाने पॅडलरच्या ताब्यातून 400 ग्रॅम एमडीही जप्त केला आहे. हे अंमली पदार्थ तस्कर कुर्ला, अंधेरी, वर्सोवा आणि नवी मुंबई या उपनगरांमध्ये बऱ्याच दिवसांपासून सक्रिय होते. मात्र, आता या प्रकरणावरून फक्त बॉलिवूड नाही तर आता टॉलिवूड सिनेसृष्टीलादेखील ड्र्ग्जचे गालबोट लागल्याचे स्पष्ट होत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी