30 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeएज्युकेशनMMS Scandal in Bhopal: चंदीगडनंतर आता देशातील आणखी एका विद्यापीठातील एमएमएस स्कँडल...

MMS Scandal in Bhopal: चंदीगडनंतर आता देशातील आणखी एका विद्यापीठातील एमएमएस स्कँडल उघड!

मध्यप्रदेशची राजधानी असणाऱ्या भोपाळमध्ये एका विद्यार्थीनीचा कॉलेजच्या बाथरूममधील व्हिडिओ बनवल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. भोपाळमधील एका आयटीआय कॉलेजमध्ये एका विद्यार्थिनीचा बाथरूममध्ये कथित व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल केले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणात स्थानिक पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली असून सध्या याप्रकरणातील तपास सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

चंदीगड विद्यापीठातील वस्तीगृहात मुंलीचे अंघोळ करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाल्याचे घटनेने संपूर्ण देशात हाहाकार माजला आहे. हे प्रकरण निवळण्याच्या मार्गावर असतानाच आता देशातील आणखी एका विद्यापीठातील अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्यप्रदेशची राजधानी असणाऱ्या भोपाळमध्ये एका विद्यार्थीनीचा कॉलेजच्या बाथरूममधील व्हिडिओ बनवल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. भोपाळमधील एका आयटीआय कॉलेजमध्ये एका विद्यार्थिनीचा बाथरूममध्ये कथित व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल केले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणात स्थानिक पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली असून सध्या याप्रकरणातील तपास सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. एका वृत्तसंस्थेच्या वृत्तसंस्थेनुसार पोलिसांनी सांगितले की, “भोपाळमधील आयटीआय कॉलेजच्या 3 माजी विद्यार्थ्यांवर वॉशरूममध्ये एका विद्यार्थिनीचा अश्लील व्हिडिओ शूट करून तिला ब्लॅकमेल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तीन आरोपींपैकी 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून उर्वरित एका आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत. या प्रकरणात पुढील कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.”

अशोका गार्डनच्या पोलिस स्थानकातील पोलिस अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला सांगितले की, “आयपीसीच्या कलम 384 आणि आयटी कायद्याच्या 67 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे. हे तीन आरोपी विद्यार्थिनीचा व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल करत तिच्याकडे पैशांची मागणी करत असल्याचे समजते. कॉलेजमध्ये एका कार्यक्रमादरम्यान मुलगी कपडे बदलण्यासाठी वॉशरूममध्ये गेली होती, तेव्हा या तीन आरोपी विद्यार्थ्यांनी तिचा व्हिडिओ बनवला.” अशी प्राथमिक माहिती सध्या प्राप्त झाली आहे.

हे सुद्धा वाचा –

Drug racket busted in Bengaluru: बॉलिवूडनंतर आता दाक्षिणात्य सिनेसृष्टीत ड्रग्जचा शिरकाव! एका अभिनेत्याला अटक

Infosys founder Narayan Murthy: ‘भारताने आर्थिक क्षेत्रात मनमोहन सिंह पंतप्रधान असताना म्हणावी तशी प्रगती केली नाही’

India-Australia T-20 Series – पहिला डाव देवाला देत भारताचे मालिकेत पुनरागमन!

वास्तविक,  यापूर्वी चंदीगड विद्यापीठातील एका विद्यार्थिनीने अनेक विद्यार्थिनींचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवले होते, जे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. विद्यापीठाच्या वसतिगृहात एका विद्यार्थ्यावर अनेक मुलींचा बाथरूममध्ये आंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर अनेक विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केला. या तरुणीने मुलींचे व्हिडिओ शूट करून तिच्या दोन मित्रांना पाठवले होते, असे सांगण्यात आले. मात्र, नंतर पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्यासह आणखी दोघांना अटक केली आहे. सध्या या प्रकरणातीसल पुढील तपास सुरू असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलिस प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

दरम्यान, अगदी कमी कालावधीत एकापाठोपाठ एक अशा घटना उघड झाल्यामुळे शिक्षम घेत असलेल्या विद्यार्थीनींमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे विद्यापीठे, महाविद्यालये आणि एकदंरीत शैक्षणिक स्थाने विद्यार्थीनींसाठी सुरक्षित आहेत का? असा संतप्त सवाल सध्या उपस्थित केला जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी