29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संवेदनशीलता; रुग्णांना एअर लिफ्ट करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संवेदनशीलता; रुग्णांना एअर लिफ्ट करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दळणवळण सुविधांना प्राधान्य देतानाच आरोग्यसुविधांच्या बाबतीत देखील ते सतर्क असतात. राज्याच्या ग्रामीण भागापर्यंत तातडीची आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी यासाठी ते आग्रही असतात. तशा सुचना देखील ते अधिकाऱ्यांना वेळोवेळी देत असतात. सोमवारी एका बैठकीत मुख्यमंत्र्यांनी विमानतळांच्या विस्तारीकरणाबरोबरच प्रत्येक तालुक्यात तयार करण्यात यावे, जेणेकरुन एखाद्या गंभीर रुग्णाला एअर लिफ्ट करण्याकरता हेलिपॅडचा उपयोग करता येईल अशा सुचना देखील त्यांनी केल्या.

राज्याच्या प्रगतीसाठी दळणवळण सुविधांची उपलब्धता असणे गरजेचे आहे. त्यावरच राज्याच्या आर्थिक समृद्धीचा विकास देखील होत असतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दळणवळण सुविधांना प्राधान्य देतानाच आरोग्यसुविधांच्या बाबतीत देखील ते सतर्क असतात. राज्याच्या ग्रामीण भागापर्यंत तातडीची आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी यासाठी ते आग्रही असतात. तशा सुचना देखील ते अधिकाऱ्यांना वेळोवेळी देत असतात. सोमवारी एका बैठकीत मुख्यमंत्र्यांनी विमानतळांच्या विस्तारीकरणाबरोबरच प्रत्येक तालुक्यात तयार करण्यात यावे, जेणेकरुन एखाद्या गंभीर रुग्णाला एअर लिफ्ट करण्याकरता हेलिपॅडचा उपयोग करता येईल अशा सुचना देखील त्यांनी केल्या.

सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाची बेठक मंत्रालयात पार पडली. यावेळी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर आणि संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

या बैठकी दरम्यान राज्यातील विमानतळे आणि काही ठिकाणी असलेल्या धावपट्ट्यांविषयी सविस्तर चर्चा झाली. यावेळी राज्यातील विमानतळे आणि धावपट्ट्यांवर चर्चा झाली. धावपट्ट्यांच्या विस्तारीकरणाबाबत मुख्यमंत्र्यांनी सुचना देतानाच प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड उभारण्याच्या सूचना देखील यावेळी अधिकाऱ्यांना केल्या. जेणेकरुन ग्रामीण भागातील एखाद्या गंभीर रुग्णाला तातडीने रुग्णसेवा उपलब्ध करुन देता येण्यासाठी हेलिपॅडची सुविधा असल्यास रुग्णांना एअरलिफ्ट करता येईल. राज्यात सध्या १५ विमानतळे असून, २८ धावपट्ट्या आहेत. याबाबत देखील यावेळी चर्चा झाली.
हे सुद्धा वाचा :

मुंबई विद्यापीठाचा अजब कारभार, कायद्याच्या अभ्यासक्रमात बेकायदा उपद्व्याप !

‘गोमूत्र पवित्र, पण दलित अपवित्र…’

‘मेलो असतो तर बरं झालं असतं’ छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानामुळे उदयनराजे भावुक

तसेच पर्यटनाला चालना मिळावी यासाठी देखील कोयना, कोकण समुद्र किनारपट्टी, गोसीखुर्द याभागात सी- प्लेन सुरू करण्याबाबत काय करता येईल याची चाचपणी करण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच राज्यातील विमानतळांचा पूर्ण क्षमतेने वापर करण्याच्या दृष्टीने राज्यातील सोलापूर, रत्नागिरी, गोंदिया, शिर्डी, अमरावती या विमानतळांबाबत देखील सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी शिर्डी विमानतळावर नाईट लॅंडिगची सुविधा सुरू करण्याच्याबाबत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडे प्रस्ताव पाठवला असून त्यावाबत देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी आढावा घेतला.

यावेळी अमरावती, शिर्डी, गोंदिया, रत्नागिरी, सोलापूर येथील विमानतळांबाबतही चर्चा करण्यात आली. औरंगाबाद येथील विमानतळांचा पूर्णक्षमतेने वापर होत असून, शिर्डी विमानतळावर नाइट लैंडिंगची सुविधा निर्माण करण्याचा प्रस्ताव नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडे पाठविण्यात आला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी