27 C
Mumbai
Sunday, February 5, 2023
घरमहाराष्ट्र'गोमूत्र पवित्र, पण दलित अपवित्र...'

‘गोमूत्र पवित्र, पण दलित अपवित्र…’

सुदर्शन रामबद्रन आणि डॉ. गुरू प्रकाश पासवान लिखित ‘मेकर्स ऑफ मॉडर्न दलित हिस्टरी’ या पुस्तकाच्या ‘दलित इतिहासाचे आधुनिक शिल्पकार’ या मराठी अनुवादाचे प्रकाशन रविवारी (ता. २७ नोव्हेंबर) फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अँफी थिएटरमध्ये संपन्न झाला.

सुदर्शन रामबद्रन आणि डॉ. गुरू प्रकाश पासवान लिखित ‘मेकर्स ऑफ मॉडर्न दलित हिस्टरी’ या पुस्तकाच्या ‘दलित इतिहासाचे आधुनिक शिल्पकार’ या मराठी अनुवादाचे प्रकाशन रविवारी (ता. 27 नोव्हेंबर) फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अँफी थिएटरमध्ये संपन्न झाला. परम मित्र पब्लिकेशनतर्फे प्रकाशित या पुस्तकाचा अनुवाद ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर यांनी केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे (डिक्की) संस्थापक अध्यक्ष, पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे, डेक्कन एज्युकेशनच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, साहित्यिक शरणकुमार लिंबाळे, मुकुंद कमलाकर, प्रा. अनिरुद्ध देशपांडे, सुदर्शन रामबद्रन, डॉ. गुरुप्रकाश पासवान प्रा. उज्ज्वला हातागळे आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. मिलिंद कांबळे म्हणाले, या पुस्तकातून चांगला आशय पुढे येत आहे. लोकशाही प्रस्थापित पाहिजे, असे डॉ. आंबेडकर यांनी सांगितले होते. पण, दलित समाजाच्या आर्थिक विकासासाठी प्रयत्न झाले नाहीत. समन्वयातून आर्थिक विकासाचा प्रयत्न ‘डिक्की’ मार्फत केला जात आहे. सोबतंच आपण सर्व एक आहोत, सर्व हिंदू आहोत, असे म्हणण्याची गरज आहे. एक निर्दोष समाज आवश्यक असून, त्यासाठी विषमता, भेदभाव संपले पाहिजेत. जात, प्रदेशानुसार पाहिले की आपण सव्वाशे कोटी राहत नाही, तर कमी होतो, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी व्यक्त केले. पुढे भय्याजी जोशी म्हणाले की, जे हिंदू समाजजीवनाचे प्रश्न आहेत, ते एकत्रित पाहिले पाहिजेत. देशाबद्दल विचार केला पाहिजे. प्रश्नाला उत्तर शोधणारे उभे राहिले पाहिजे. प्रश्नांना घाबरू नये, ते सोडविणे ही आपली जबाबदारी आहे.

हे सुद्धा वाचा

‘मेलो असतो तर बरं झालं असतं’ छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानामुळे उदयनराजे भावुक

चंद्रकांत पाटलांनी बेळगावचे नाव बदलले!; मनीषा कायंदे यांचा संताप

औषधोपचारांचा खर्च दिला नाही म्हणून नवविवाहितेची हत्या केली; लातूरमधील धक्कादायक प्रकार उघड

याप्रसंगी बोलत असताना प्रा. लिंबाळे म्हणाले की, हा देश महान व्हावा, हिंदू समाज प्रगत व्हावा, हीच आमची इच्छा आहे. आता संवाद झाला पाहिजे, त्याशिवाय समता नाही. लोकशाही जिवंत ठेवली पाहिजे, म्हणून संवाद आवश्यक आहे. दलितांनीही मूठभर अन्याय करणायांविरुद्ध बोलताना संपूर्ण हिंदू समाजाविरुद्ध बोलू नये. असं म्हणत लिंबाळे यांनी आपले मत व्यक्त केले. यावेळी सुधीर जोगळेकर, सुदर्शन रामबद्रन, डॉ. गुरुप्रकाश पासवान यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. शिवाय संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील भणगे यांनी केले.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!