25 C
Mumbai
Tuesday, January 31, 2023
घरएज्युकेशनमुंबई विद्यापीठाचा अजब कारभार, कायद्याच्या अभ्यासक्रमात बेकायदा उपद्व्याप !

मुंबई विद्यापीठाचा अजब कारभार, कायद्याच्या अभ्यासक्रमात बेकायदा उपद्व्याप !

परिक्षांसाठी अर्ज आणि परिक्षा शुल्क भरत असताना अनेक विद्यार्थ्यांना अडचणींना सामना करावा लागत होता. यावर उपाय म्हणून विद्यार्थ्यांनी आधी परिक्षा द्यावी त्यानंतर कालांतराने परिक्षा शुल्क आणि अर्ज भरण्याचे काम पूर्ण करावे अशी अजब सुचना विद्यापीठाच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर देण्यात आल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण तयार झाल्याचे पाहायला मिळत आहे.

मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभारावर आजवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आली आहेत. आजवर अनेकदा मुंबई विद्यापीठाच्या परिक्षांबाबत धक्कादायक खुलासे करण्यात आलेले आहेत शिवाय याबाबत अनेकदा विद्यापीठाला जाब विचारण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला आहे मात्र, अजूनही विद्यापीठाचा कारभार सुरळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळत नाही. यावेळी आता मुंबई विद्यापीठाच्या विधी शाखेच्या पाचव्या सत्राच्या परिक्षेबाबत गोंधळ समोर आला आहे. या परिक्षांसाठी अर्ज आणि परिक्षा शुल्क भरत असताना अनेक विद्यार्थ्यांना अडचणींना सामना करावा लागत होता. यावर उपाय म्हणून विद्यार्थ्यांनी आधी परिक्षा द्यावी त्यानंतर कालांतराने परिक्षा शुल्क आणि अर्ज भरण्याचे काम पूर्ण करावे अशी अजब सुचना विद्यापीठाच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर देण्यात आल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण तयार झाल्याचे पाहायला मिळत आहे.

मंगळवार (29 नोव्हेंबर)पासून मुंबई विद्यापीठाच्या विधी विभागाच्या तीन वर्षाच्या अभ्यासक्रमातील पाचव्या सत्राच्या परिक्षेला सुरुवात होत आहे. परीक्षेच्या तोंडावर अद्यापही विद्यार्थ्यांना हॉल तिकीटच उपलब्ध झालेली नाहीत. काही विद्यार्थ्याना हॉल तिकीट देण्यात आले. मात्र त्यांच्या परीक्षा केंद्राचाच पत्ता नाही. फोर्ट येथील सिद्धार्थ लॉ कॉलेजमध्ये हा प्रकार घडला आहे. हॉल तिकिटावर नमूद केल्याप्रमाणे मंगळवारी विद्यार्थी या परीक्षा केंद्रावर आपली बैठक व्यवस्था पाहण्यासाठी गेले होते. मात्र तेथे गेल्यावर या कॉलेजमध्ये विधी शाखेची परीक्षा नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आता परीक्षा कुठे द्यायची असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. यातील अनेक विद्यार्थ्यांनी याप्रकरणी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाशी संपर्क साधला, पण तो होऊ शकला नाही.

हे सुद्धा वाचा

‘गोमूत्र पवित्र, पण दलित अपवित्र…’

राजधानीतले मराठी नेतृत्व (ज्येष्ठ पत्रकार डॉ. विजय चोरमारे यांचा लेख)

‘मेलो असतो तर बरं झालं असतं’ छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानामुळे उदयनराजे भावुक

सकाळी 10 वाजता परीक्षेला सुरुवात होणार आहे. अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातून परीक्षा देण्यासाठी मुंबईत येणार आहेत. पण आता काय करावे, असा प्रश् त्यांच्यासमोर उपस्थित झाला आहे. अनेक विद्यार्थ्यांना मंगळवारी संध्याकाळपर्यंत कॉलेजमधून हॉल तिकीट उपलब्ध होतील असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे उद्या परीक्षेला जाताना नेमक्या कुठल्या परीक्षा केंद्रावर परीक्षेला जायचे याबाबत अजूनही विद्यार्थी अनभिज्ञ आहेत. तसेच परीक्षेला जायच्या अगोदर हॉल तिकीटवर प्राचार्यांचा शिक्का व सही घेणे आवश्यक असते. त्यामुळे उद्या महाविद्यालयात जाऊन सही शिक्का घ्यायचा की वेळेत परीक्षा केंद्रावर पोहचायचे, असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहे.

7 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा डोलारा वाहणाऱ्या मुंबई विद्यापीठाचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांच्या हाती आहे. विद्यापीठातील एकही महत्त्वाच्या पदावर पूर्णवेळ अधिकाऱ्याची नेमणूक नसल्यामुळे परीक्षा विभागासह अन्य विभागांच्या कामकाजाचे तीनतेरा वाजले आहेत. याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांवर होत आहे. कुलगुरू नसल्यामुळे बोर्ड ऑफ स्टडी, रिसर्च शिफारस, व्यवस्थापन परिषदसह अन्य कामे ठप्प झाली आहेत. जबाबदार व्यक्ती नसल्यामुळे परीक्षा आणि निकाल संबंधित अनेक निर्णयप्रक्रियेत वेळकाढूपणा तसेच निष्काळजीपणा दिसत आहे. याचा फटका सध्या विधी शाखेच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना बसत आहे. परीक्षेला अवघे काही तास उरले असतान हे विद्यार्थी अभ्यास सोडून परीक्षा अर्ज भरणे, शुल्क जमा करणे, हॉल तिकीट मिळवणे, परीक्षा केंद्राची शोधाशोध करीत आहे. विद्यार्थ्यांना होणाऱ्या या त्रासाला विद्यापीठाचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याची टीका होत आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!