27 C
Mumbai
Saturday, March 18, 2023
घरमहाराष्ट्रराजस्थानमधील कार्यकर्त्यांचा एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश

राजस्थानमधील कार्यकर्त्यांचा एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या विस्ताराचा धडाका सुरुच ठेवला असून शुक्रवारी (दि.३) रोजी राजस्थानमधील  (Rajasthan) मंजित सिंह पाल (सावरदा) यांनी (Manjit Singh Pal) काही कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. बाळासाहेब भवन येथे शुक्रवारी (दि.३) रोजी राजस्थान येथील मंजित सिंह पाल (सावरदा)यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या साथीने बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात जाहीर प्रवेश केला असल्याचे ट्विट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. (Eknath Shinde’s party to join Manjit Singh Pal from Rajasthan)

मुशिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर एकनाथ शिंदे  यांनी भाजपसोबत राज्यात सत्तास्थापन करत मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्याचबरोबर त्यांनी शिवसेना पक्षावर देखील दावा केला असून या संदर्भात सध्या केंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असून केंद्रीय निवडणूक आय़ोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव तात्पुरत्या स्वरुपात दिले आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राज्यासह देशातील इतर राज्यांमध्ये देखील पक्ष विस्ताराचे काम सुरु आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यातून अनेक कार्यकर्ते बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करत आहेत. त्याच वेळी परराज्यात देखील शिंदे यांनी आपले लक्ष केंद्रीत केले असून अनेकजण शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करत आहेत.


उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर जुलै २०२२ मध्ये शिंदे यांनी आपल्या समर्थकांसह मुंबईतील ट्रायडंट ह़ॉटेल येथे बैठक घेऊन स्वतंत्र राष्ट्रीय जाहीर केली होती. दरम्यान शिवसेना पक्ष कुणाचा हा वाद केंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्वौच्च न्यायालयात गेल्यानंतर निवडणूक आयोगाने शिंदे आणि ठाकरे यांना तात्पूरत्या स्वरुपात पक्षाचे नाव आणि पक्ष चिन्ह दिले आहे. त्यानुसार शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव आणि ढाल तलवार हे पक्षचिन्ह मिळाले आहे.

हे सुद्धा वाचा

आदित्य ठाकरेंचे मुंबई महापालिका प्रशासकांना पत्र; सत्ताधाऱ्यांना निवडणुका घ्यायच्या नाहीत, मुंबईचे खच्चीकरण करण्याचा हेतू

IAS Promotion : म्हैसकर दाम्पत्यासह सहा सनदी अधिकाऱ्यांना अतिरिक्त मुख्य सचिवपदी बढती

गिरीश महाजनांनी तृतीयपंथियांसाठी उचलले मोठे पाऊल

शिंदे यांनी आपल्या पक्षाचा विस्तार सुरु केला असून परराज्यातून देखील शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षात कार्यकर्ते प्रवेश करत आहेत. आज राजस्थान येथील कार्यकर्त्यांनी शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला असून याबाबत शिंदे यांनी ट्विटरवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ‘बाळासाहेब भवन येथे राजस्थान येथील मंजित सिंह पाल (सावरदा)यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या साथीने बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात जाहीर प्रवेश केला.यावेळी त्यांना राज्यस्थान राज्यात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षवाढ करण्यासाठी तसेच त्यांना त्यांच्या भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.’

 

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी