33 C
Mumbai
Saturday, May 11, 2024
Homeमहाराष्ट्रनाशिक शहरातील विदेशी वृक्षलागवडविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

नाशिक शहरातील विदेशी वृक्षलागवडविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

महापालिकेने शहरात रस्ता दुभाजकात नुकतीच लागवड केलेली विदेशी वृक्षप्रजातींची रोप पुढील ८ दिवसात उद्यान विभागाने काढावी . अन्यथा नाइलाजास्तव आम्हालाच हि रोप काढून होळी करण्याशिवाय पर्याय राहणार नाही व याबाबत होणाऱ्या नुकसानीस फक्त उद्यान विभागच जबाबदार राहील असा इशारा पर्यावरप्रेमींनी दिला आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष आता उद्यान विभाग काय भूमिका घेतो याकडे आहे. NCAP च्या धोरणात शहरातील शुद्ध हवेसाठी स्थानिक भारतीय वृक्षप्रजातींचीच लागवड करण्याचे स्पष्ट निर्देश असतांना भारत सरकारच्या NCAP अंतर्गत हवा शुद्ध करण्यासाठी मिळालेल्या निधीचा वापर ठेकेदारांच्या हितासाठी उद्यान विभाग शहरातील दुभाजकात मादागास्कर या पर्यावरण विघातक एकाच एक विदेशी वृक्षप्रजातीची लागवड करून केंद्र सरकारची व शहराच्या शुद्ध हवेची फसवणूक करीत आहे असा आरोप पर्यावरण प्रेमींनि केला आहे.(Environmentalists protest against exotic tree plantation in Nashik city )

भारतीय वृक्षप्रजातींची लागवड करून पशुपक्षांना अधिवास निर्माण करणे,नैसर्गिक अन्नसाखळी अबाधित राखणे आणि त्यातून जैवविविधता वाढविणे व टिकविणे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शासनाने वेळोवेळी जिल्हाधिकारी , पालिका आयुक्तांच्या उपस्थीतीत विदेशी वृक्षप्रजातींची लागवड व वाटप थांबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. राज्य सरकारचे वातावरणीय बदल धोरण व नगररचना विभागाच्या अनुसूचितही प्रादेशिक भारतीय वृक्षप्रजातींचीच लागवड करण्याबाबत स्पष्ट आदेश देण्यात आलेले आहेत. विदेशी वृक्षप्रजातींच्या लागवडीचे दुष्परिणाम लक्षात आल्यावर याबाबत शासनाने दिलेले आदेश व शासनाच्या उद्दिष्टांकडे दुर्लक्ष करून वडासारखी वृक्षसंपत्ती तोडून विविध भारतीय वृक्षप्रजातींचा खजीना असतांनाहि झालेल्या चुकांमधून कुठलाही बोध न घेता पुन्हा विदेशी वृक्षप्रजातींच्याच लागवडीची चुक करण्याचा हट्ट नाशिक उद्यान विभाग कशासाठी करीत आहेत याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई होणे गरजेचे झालेले आहे. २५० पेक्षा जास्त भारतीय वृक्षप्रजातींची यादी देवून,प्रत्यक्ष भेटून व अनेक वेळा याबाबत पत्रव्यवहार करूनहि १० कोटी पेक्षा जास्त वार्षिक वृक्षनिधी असलेली पालिका शासनाचा अध्यादेश असूनही रस्त्याच्या कडेला वृक्षलागवडीस टाळाटाळ करीत आहे. कडूलिंब,पिंपळासारखी हवा शुद्ध करणारे,बहावा,ताम्हण सारखी अनेकविध शोभिवंत भारतीय वृक्षप्रजाती असतांना पालिकेची विदेशी वृक्षांची गुलामी आम्ही आता सहन करणार नाही असे पर्यावरण प्रेमींनी सांगितले.

राज्य शासनाच्या आदेशानुसार २०१९ नंतर लागवड केलेली सर्व विदेशी वृक्षप्रजाती पालिकेने काढून टाकावी . त्या ऐवजी विविध भारतीय वृक्षप्रजातींचीच लागवड करण्याची विनंती आम्ही मनपा उद्यान विभागाला केली आहे. त्यासाठी अल्टिमेटम देण्यात आला असून त्यांनतर आम्ही याबाबत ठोस भूमिका घेऊ .
मनीष बाविस्कर , पर्यावरणप्रेमी , नाशिक

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी