31 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeआरोग्यतुळशीच्या बिया आहे शरीरासाठी फायदेशीर, जाणून घ्या

तुळशीच्या बिया आहे शरीरासाठी फायदेशीर, जाणून घ्या

भारतात तुळशीच्या रोपाची पूजा केली जाते आणि याच कारणामुळे ही तुळशीचं झाड तुम्हाला बहुतेक घरांमध्ये पाहायला मिळते. पण तुळशी हे आयुर्वेदातही प्रसिद्ध औषध आहे. (Health tips benefits of basil seeds) अनेक आजारांपासून सुटका मिळवण्यासाठीही याचा उपयोग होतो. तुळशीचे एक पान तुमच्या आरोग्याच्या अनेक समस्या दूर करू शकते. तुळशीच्या पानांनी सर्दी, खोकला सहज बरा होतो. पण फक्त तुळशीची पानेच नाही तर त्याच्या बिया देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. तुळशीच्या बियांमध्ये फायबर, आवश्यक फॅटी ऍसिडस्, अँटी-ऑक्सिडंट्स, लोह आणि मॅग्नेशियमसारखे घटक आढळतात. (Health tips benefits of basil seeds) 

उन्हाळ्यात तुमचा पण मेकअप वितळतो का? मग आजच फॉलो करा ‘या’ टिप्स

तुळशीच्या बियांनी वजन देखील कमी होण्यास मदत मिळते. तुळशीच्या बियांना सब्जा बी , फालूदा बी किंवा तुकमारिया बी असेही म्हणतात, या बिया पौष्टिकतेच्या पॉवरहाऊस आहे. या बिया दिसायला जरी तीळासारख्या असतात पण त्यांचा रंग काळा असतो. तुम्ही ज्या बिया खाऊ शकता त्या साधारणपणे गोड तुळस, ऑसिमम बेसिलिकममधून मिळतात. (Health tips benefits of basil seeds)

आता घरीबसल्या बनवा नैसर्गिक ब्लश, तुमची त्वचा राहणार निरोगी

तुळशीच्या बिया या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर असतात. त्यांचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारण्यास, वजन कमी करण्यास, रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यास, शरीर थंड ठेवण्यास, तणाव कमी करण्यास आणि जळजळ कमी करण्यास मदत होते. तर आज जाणून घेऊ या की तुळशीच्या बियांचे सेवन केल्याने शरीराला कोणते फायदे होतात. (Health tips benefits of basil seeds)

जाणून घ्या, कडक उन्हाळ्यात ताक पिण्याचे फायदे

  • तुळशीच्या बिया कमजोर प्रतिकारशक्ती मजबूत करतात. अशा परिस्थितीत, तुमची कमकुवत प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी तुम्ही तुळशीच्या बियांचा काढा बनवून पिऊ शकता.
  • जर तुम्हाला ॲसिडिटी आणि गॅस सारख्या पोटाशी संबंधित समस्या असतील तर तुळशीच्या बिया तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. 1 चमचे तुळशीचे दाणे एका ग्लास पाण्यात टाकून ते फुगल्यानंतर प्या.
  • तुळशीच्या बियांचे सेवन हे बद्धकोष्ठतेवर नैसर्गिक आणि प्रभावी उपाय ठरू शकते. तुळशीच्या बियांमध्ये विशेषतः फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात जे पचन सुधारतात आणि बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत करतात.
  • मधुमेहाच्या रुग्णांसाठी तुळशीच्या बिया फायदेशीर ठरतात. तुळशीच्या बियांमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे मधुमेहामध्ये रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

    तुळशीच्या बियांचे फायदे
  • वजन कमी करण्यात मदत करतात.
  • शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करतात.
  • सर्दी आणि तापापासून आराम
  • पचनक्रिया सुधारणे
  • शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे
  • बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करणे
  • त्वचेसाठी फायदेशीर
  • केसांसाठी फायदेशीर

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी