28.1 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रProtest : गाढव मोर्चा महावितरण कार्यालयावर धडकणार या भीतीने अधिकारी धूम पळाले

Protest : गाढव मोर्चा महावितरण कार्यालयावर धडकणार या भीतीने अधिकारी धूम पळाले

वरिष्ठांच्या लेखी आश्वासनानंतर ग्राहक प्रबोधन समितीने आंदोलन मागे घेतले

टीम लय भारी

दहिवडी : महावितरणचे कर्मचारी ग्राहकांना व शेतक-यांना नाहक त्रास देत असून हजारो रुपयांची भरमसाठ बिले दिली गेली आहेत. यामुळे संतापलेल्या ग्राहकांनी दहिवडी उपविभागीय महावितरण कार्यालयावर गाढव मोर्चा काढण्याचे ठरवले होते. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्याने ग्राहक प्रबोधन समितीने येथे ठिय्या आंदोलन (Protest ) केले.

लाईट बिला संदर्भात संतप्त ग्राहकांनी महावितरण कार्यालयासमोर लाईट बिलाची होळी केली. अधिकारी व कर्मचारी शेतकरी वर्गाला नाहक त्रास देत आहेत. मीटर रिडींग न पाहता अव्वाची सव्वा बिले दिली जात असल्याचे यावेळी सांगितले. अनेक वेळा लेखी तसेच तोंडी सूचना देऊन देखील या विभागाचे कर्मचारी दुर्लक्ष करत असल्याचेही यावेळी ते म्हणाले.

वरिष्ठ पातळी वरून लक्ष घालून नवीन रिक्त पदे भरावीत तसेच बिल दुरुस्ती करून घ्यावीत व शेतकरी व वीज ग्राहक यांना न्याय द्यावा या मागणीसाठी आंदोलन आम्ही केले होते. ग्राहकांच्या समस्यांचे निरसन करण्यात येईल, या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान पोलीस प्रशासनाच्या सुचनेनुसार गाढव मोर्चा रद्द करुन फक्त ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

महावितरणचे कर्मचारी ग्राहकांना व शेतक-यांना नाहक त्रास देत असून हजारो रुपयांची भरमसाठ बिले दिली गेली आहेत. महावितरण कार्यालयात ग्राहक व शेतक-यांना टोलवाटोलवीची उत्तरे देण्यात येत आहेत. हजारो शेतकरी तसेच वीज ग्राहक वीज बिल दुरुस्तीसाठी येतात. मात्र त्यांना दाद न देता अरेरावीची भाषा केली जाते. या सर्व बाबींविरोधात हे आंदोलन करण्यात आले. आंदोलक येताच काही कनिष्ठ अधिकारी कार्यालय सोडून गेले होते. वरिष्ठ अधिकारी यांनी फोन करून त्यांची चांगलीच कानउघडणी केली.

आंदोलन होणार असल्याचे लेखी पत्र देऊन देखील कोणीच वरिष्ठ अधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी महावितरण विरोधात घोषणाबाजी केली. तसेच वीज बिलाची होळी करण्यात आली. त्यानंतर काही वेळात वरिष्ठ अधिकारी आंदोलनस्थळी उपस्थित झाले.

अधिकारी व कार्यकर्ते यांच्यात चर्चा झाली. नंतर महावितरणच्या अधिका-यांनी लेखी स्वरूपात उत्तर दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी राजू मुळीक, शारदा भस्मे, एकनाथ वाघमोडे, वैभव जाधव, आकाश मुळीक, शंभूराज जाधव, विक्रम जाधव, शंकर मुळीक, आशिष पवार, ज्ञानेश्वर घाडगे, गंगाराम, गोडसे, आशिष मुळीक, अनिकेत शिंदे, सुरज कदम, शुभम खाडे, सागर जाधव, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

कोरोना काळात आम्ही काही जागा वरिष्ठ यांच्या आदेशानुसार कमी केल्या होत्या. त्या जागा पुन्हा भरण्यासाठी आम्ही पत्र दिले आहे. लवकरच त्या जागा भरल्या जातील. त्यानंतर अशा अडचणी निर्माण होणार नाहीत याची आम्ही दखल घेऊ तसेच कोणाची अडवणूक करू नये म्हणून कर्मचा-यांना देखील आम्ही सांगितले आहे – दत्ता शिंदे, प्र. उपकार्यकारी अभियंता, दहिवडी विभाग

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी