28.1 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रMaratha Reservation : ९ डिसेंबरच्या सुनावणीसाठी वकिलांची समन्वय समिती जाहीर

Maratha Reservation : ९ डिसेंबरच्या सुनावणीसाठी वकिलांची समन्वय समिती जाहीर

टीम लय भारी

मुंबई : एसईबीसी आरक्षण (Maratha Reservation) प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश रद्द करण्याच्या राज्य शासनाच्या मागणीसंदर्भात ५ सदस्यीय घटनापिठासमोर होणा-या सुनावणीच्या अनुषंगाने मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी पाच वकिलांची समन्वय समिती जाहीर केली आहे.

चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, या समन्वय समितीमध्ये अॅड. आशिष गायकवाड, अॅड. राजेश टेकाळे, अॅड. रमेश दुबे पाटील, अॅड. अनिल गोळेगावकर व अॅड. अभिजीत पाटील यांचा समावेश आहे.

मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला अंतरिम आदेश रद्द करण्याच्या मागणीसाठी येत्या ९ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता होणा-या सुनावणीच्या अनुषंगाने मराठा समाजातील नागरिक, समन्वयक, जाणकार, अभ्यासक व संघटनांना कायदेशीर स्वरूपाच्या सूचना मांडायच्या असतील तर त्यांनी समन्वय समितीतील सदस्यांशी संपर्क साधावा. ही समिती आलेल्या सूचनांचा अभ्यास करून त्याबाबत राज्य शासनाच्या वकिलांना माहिती देईल, असे चव्हाण यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी