31 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रमाजी IPS अधिकारी संजय पांडे 'नॉट रिचेबल'

माजी IPS अधिकारी संजय पांडे ‘नॉट रिचेबल’

टीम लय भारी

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे हे ३० जून रोजी आपल्या पदावरून निवृत्त झाले. त्यानंतर त्यांना लगेच तीन दिवसाच्या आत ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली आणि ते ५ जुलैला ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले. पण आता त्यांच्यावर सीबीआयकडून तीन आणि ईडीकडून दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सीबीआय आणि ईडीकडून गुन्हे दाखल करण्यात आल्यानंतर आता संजय पांडे हे नॉट रिचेबल असल्याचे सांगण्यात येत आहे. पहिल्यांदाच एका आयपीएस अधिकाऱ्यावर अशा प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आल्याने खळबळ माजली आहे. संजय पांडे हे नॉट रिचेबल येत असल्याने अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या घरावर आणि कार्यालयावर सीबीआयकडून आज (दि. ८ जुलै २०२२) छापेमारी करण्यात आली. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे हे अचानक केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर का आले ? आणि त्यांचा आणि एनएसई घोटाळ्याशी नेमका काय संबंध आह ? असे अनेक प्रश्न आता निर्माण झाले आहेत.

हे सुद्धा वाचा :

Breaking : राज्यातील 92 नगरपरिषदा आणि 4 नगर पंचायतींच्या निवडणुका जाहिर

राज्यपालांची सुचना, वि. दा. सावरकर यांचे नाव मुंबई विद्यापीठाच्या वसतिगृहाला द्या

VIDEO : मुंबई पोलिसांच्या चांगल्या मोहीमेला महापालिकेच्या हप्तेखोरीचा कोलदांडा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी