29 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रGaneshotsav 2022 : ‘सत्ताधाऱ्यांचे समुद्रमंथन आणि कार्यकर्त्यांचे मरण’, आणखी एक वादग्रस्त देखावा

Ganeshotsav 2022 : ‘सत्ताधाऱ्यांचे समुद्रमंथन आणि कार्यकर्त्यांचे मरण’, आणखी एक वादग्रस्त देखावा

सलग दोन वर्षे कोरोना संकटामुळे कोणतेच सण साजरे करता आले नाहीत, मात्र आता हे संकट थोडे ओसरल्यामुळे यंदाचे सण जोरात, धुमधडाक्यात साजरा करण्याचा प्रत्येकाचा मानस दिसून येत आहे. यंदाचा गणेशोत्सव सुद्धा याला अपवाद ठरलेला नाही, त्यामुळे सगळी मंडळे जोरदार तयारीला लागली आहेत. गणेशोत्सवात देखावे दरवेळी चर्चेचा विषय ठरत असतात, कोणता देखावा सरस यावरून बरीच चढाओढ लागलेली असते तसेच काहीसे चित्र यावेळी सुद्धा पाहायला मिळत आहे. दरम्यान, पुण्यातील अफजल खान वधाचा जिवंत देखावा साकारण्याचा वाद ताजा असताना आणखी एका देखाव्याची यात भर पडली आहे. या देखाव्याला सुद्धा पोलिसांनी ऐनवेळी परवानगी नाकारल्याने मंडळाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

दुसरा वादग्रस्त देखावा पुण्यातील नरेंद्र मित्र मंडळाकडून साकारण्यात आला असून त्यात राज्यातील सत्तांतराचा विषय दाखवण्यात आला आहे. ‘सत्ताधाऱ्यांचे समुद्रमंथन आणि कार्यकर्त्यांचे मरण’  या आशयाच्या देखाव्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमने – सामने दाखवण्यात आले आहेत. हे दोघे सुद्धा सत्तेचे कशाप्रकारे सत्तेचे समुद्रमंथन करीत असून सामान्य जनतेला वेठीस ठरत आहेत याचे वर्णन या देखाव्याद्वारे करण्यात आले आहे. सदर देखावा वादग्रस्त ठरू शकतो म्हणून पुणे पोलिसांनी ऐनवेळी या देखाव्याची परवानगी नाकारली.

हे सुद्धा वाचा…

BMC : ऐन गणेशोत्सवाच्या काळात हजारो कामगारांच्या खात्यात शून्य पगार

Maharashtra Politics : आमदारांना राज्य कसे चालवावे याचे प्रशिक्षण देण्याची गरज, सत्यजीत तांबे यांचे खरमरीत पत्र

Shivsena Crisis : आणखी दोन शिलेदार उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?

अगदी शेवटच्या क्षणी परवानगी नाकारल्याने कार्यकर्त्यांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. या देख्याव्यातून कोणताच राजकीय वाद निर्माण करण्याचा हेतू नव्हता असे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले, परंतु शांतता आणि सुव्यवस्थेचे कारण देत पुणे पोलिसांनी परवानगी नाकारल्याचे मंडळाकडून सांगण्यात येत आहे. याआधी सुद्धा अफझलखान वध या देखाव्यावरून पुण्यात वाद झाला होता, त्यामुळे त्याला सुद्धा पोलिसांनी परवानगी नाकारली होती.

राज्यात सध्या सत्तांतराच्या नाट्यामुळे बरीच उलथापालथ झालेली पाहायला मिळत आहे, यामुळे काही जणांची नाराजी झाली असून ते उघडपणे व्यक्त सुद्धा करीत आहेत परंतु राज्यात सणसमारंभ व्यवस्थित पार पडावे आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून योग्य ती काळजी घेण्यात येत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी