29 C
Mumbai
Saturday, September 3, 2022
घरमुंबईBMC : ऐन गणेशोत्सवाच्या काळात हजारो कामगारांच्या खात्यात शून्य पगार

BMC : ऐन गणेशोत्सवाच्या काळात हजारो कामगारांच्या खात्यात शून्य पगार

गणोशोत्सवाचा सण म्हटला की सगळेच जण जोरदार तयारीला लागतात, परंतु या सगळ्यासाठी पैशांची गरज भासते त्यामुळे अनेकजण आधीच पगाराची सोय करून घेतात म्हणजे सगळं कार्य सुरळीत पार पडावं, काहीच अडचण येऊ नये हाच केवळ यामागे विचार. परंतु मुंबई महानगरपालिकेचे अनेक कर्मचारी यंदा पगाराविना सण साजरा करणार अशी स्थिती निर्माण झाली आहे.

गणेशोत्सवाचा सण तोंडावर आल्याने आता सगळ्यांची लगबग सुरू झाली आहे. कोरोना संकटानंतर यंदाचा सण धुमधामपणे साजरा करण्याकडे अनेकांचा कल दिसत आहे. परंतु या संपुर्ण पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना मात्र चांगलाच फटका बसल्याचे दिसत आहे. सणवार सुरू होणार तरीही पगाराचा आकडा अद्याप शून्यच असल्याचा आरोप म्यूनिसिपल मजदूर युनियनकडून करण्यात आला आहे. पगार शून्य असेल तर बाप्पाचा सण कसा साजरा करणार असा प्रश्नच कर्मचाऱ्यांना पडल्यामुळे त्यांच्याकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. सदर गोंधळ सदोष बायोमेट्रीक हजेरी मशीनमुळे झाला असून अनेकांची गैरहजेरी लागल्याने त्याचा थेट परिणाम पगारावर झाल्याचे दिसून येत आहे.

गणोशोत्सवाचा सण म्हटला की सगळेच जण जोरदार तयारीला लागतात, परंतु या सगळ्यासाठी पैशांची गरज भासते त्यामुळे अनेकजण आधीच पगाराची सोय करून घेतात म्हणजे सगळं कार्य सुरळीत पार पडावं, काहीच अडचण येऊ नये हाच केवळ यामागे विचार. असं असताना सुद्धा जर खात्यात पगार शून्यच असेल तर? मुंबई महानगरपालिकेचे अनेक कर्मचारी यंदा पगाराविना सण साजरा करणार अशी स्थिती निर्माण झाली आहे. अद्याप अनेकांच्या खात्यात पगाराची रक्कम शून्यच असल्याचे पाहायला मिळत आहे. यामागचे कारण विचारल्यास कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीचे कारण सांगण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा…

Maharashtra Politics : आमदारांना राज्य कसे चालवावे याचे प्रशिक्षण देण्याची गरज, सत्यजीत तांबे यांचे खरमरीत पत्र

Shivsena Crisis : आणखी दोन शिलेदार उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींकडून नितेश राणेंचे कौतुक म्हणाले, यह आमदार ‘कामदार’ है

दरम्यान, सदोष बायोमेट्रीक हजेरी मशीनमुळे गेल्या तीन वर्षांपासून 25 लाख कर्मचाऱ्यांची गैरहजेरी लागल्याचा धक्कादायक प्रकार आता उघडकीस आला आहे. मुंबई महानगरपालिकेने कोट्यावधींचा खर्च करत वेगवेगळ्या कंपन्यांच्या बायोमेट्रीक मशीन्स बसवून घेतल्या, मात्र त्या वारंवार बंद पडत असतात, अनेकदा नेटवर्क नसल्याने कागारांनी काम करून सुद्धा कर्मचाऱ्यांचा पगार कापला जातो अशी तक्रारच युनियन कार्याध्यक्ष अशोक जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. पालिकेच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये दर दिवसाची हजेरी घेण्यासाठी बायोमेट्रीक हजेरी मशीन्स लावण्यात आल्या आहेत, त्यामध्ये वीस कर्मचाऱ्यांमागे एक मशीन असे समीकरण असल्याचे सुद्धा त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

युनियनने केलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, गुरूवारी सांताक्रुझमध्ये असलेल्या एच/पश्चिम येथे एका कर्मचाऱ्याने हजेरीसाठी अंगठा लावला त्यावेळी काहीतरी एरर आला म्हणून सदर कर्मचाऱ्याने पुन्हा अंगठा लावला तर त्याला ‘इन’ आणि ‘आऊट’ असे दोन्ही मेसेज एकाचवेळी मिळाले, असे प्रकार वारंवार घडत असल्याने कर्मचारी प्रचंड हैराण झाल्याचे युनियनने म्हटले आहे. अनेक कर्मचारी हे अशिक्षित असतात त्यामुळे बऱ्याचदा असे होते की ते अंगठा लावतात परंतु हजेरी लागली की नाही हे ते तपासून पाहत नाहीत, त्यामुळे त्यांना नाहक या समस्येला सामोरे जावे लागत असल्याची बाब सुद्धा युनियनने समोर आणली आहे.

या संपुर्ण पार्श्वभूमीवर बोलताना युनियने म्हटले आहे की, पगार हा बायोमेट्रीक हजेरी मशीनला जोडू नये अशी आमची मागणी आहे, आतापर्यंत अनेकांची हजेरी शून्य असल्याने त्यांच्या खात्यात सुद्धा अद्याप शून्य पगारच आहे, ऐन गणेशोत्सवाच्या काळात पालिकेने कर्मचाऱ्यांचा हिरमोड केला आहे त्यामुळे याप्रकरणी योग्य ती पावले न उचलल्यास आंदोलनाचा इशाराच युनियनकडून देण्यात आला आहे, त्यामुळे या संपुर्ण प्रकरणावर महापालिकेकडून काय उत्तर येणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी