36 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रVIDEO : मुंबई बुडणार...! संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांचा इशारा

VIDEO : मुंबई बुडणार…! संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांचा इशारा

जागतिक तापमान वाढ चमत्कारिकरीत्या १.५ डिग्री सेल्सिअसपर्यंत मर्यादित राहिली, तरी देखील समुद्राच्या पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ होईल. त्यामुळे मुंबई, न्यूयॉर्कसारख्या शहरांना समुद्राच्या वाढणाऱ्या पातळीमुळे धोका पोहोचू शकतो. भविष्यात या शहरांना गंभीर समस्यांचा सामना करावा लागेल. जगातील अनेक देशांना हवामान बदलाच्या समस्येचा सामना करण्यासाठी निकराचे प्रयत्न करावे लागतील. समुद्राच्या पाण्याच्या वाढणाऱ्या पातळीमुळे आपले भविष्यही बुडणार आहे. हे आपल्या समोर मोठं संकट निर्माण झाले आहे. समुद्राच्या वाढणाऱ्या पातळीमुळे अस्थिरता आणि संघर्षाची ठिणगी अगोदरच पडली आहे. येत्या काही वर्षांतच सखल भागात राहणारे लोक आणि देश, लहान बेटं कायमची नाहीशी होतील, असा गर्भित इशारा संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी दिला आहे. (Threat to Mumbai warned Antonio Guterres in UN Security Council)

संयुक्त राष्ट्रसंघ (यूएन) सुरक्षा परिषदेत ‘समुद्राच्या पातळीत वाढ – आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेसाठी उपाय’ या विषयावर चर्चा झाली. यावेळी, गुटेरेस म्हणाले की, जागतिक हवामान संघटनेने (World Meteorological Organization) नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार मागील ३००० वर्षांतील इतिहासात १९०० शतकापासून समुद्राच्या सर्वसाधारण पातळीत सर्वाधिक वाढ झाल्याचे दिसत आहे. जागतिक महासागर गेल्या शतकात गेल्या ११,०० वर्षांतील कोणत्याही काळापेक्षा अधिक वेगाने गरम झाला आहे.

भारत, चीन, बांगलादेशला  High Alert..!

जागतिक तापमानवाढीच्या पार्श्वभूमीवर भारत, बांगलादेश, चीन आणि नेदरलँड या देशांना मोठा धोका आहे, असा इशारा अँटोनियो गुटेरेस यांनी सुरक्षा परिषदेला दिला आहे. प्रत्येक खंडातील महानगरांना म्हणजेच मुंबई, लागोस, बँकॉक, शांघाई, लंडन, ब्युनोस आर्यस आणि न्यूयॉर्क या शहरांवर याचा गंभीर परिणाम होणार आहे. याची सुरुवात झाली असून समुद्राची पातळी वाढल्यामुळे तसेच हवामान बदलामुळे सोलोमन बेटं, फिजी यांसारख्या काही देशांतील लोकांना स्थलांतरित व्हावे लागले आहे, असे अँटोनियो गुटेरेस यांनी यावेळी सांगितले.

हे सुद्धा वाचा

भाजपने आधी महाराष्ट्रातील उद्योग पळवले, आता ज्योतिर्लिंगही…

IAS डॉ. सना गुलवानी : पाकिस्तानातील पहिली महिला हिंदू आयएएस अधिकारी; भारतीयांना अभिमान, सिंधी समाजासाठी गौरवास्पद!

आमचे तपास अधिकाऱ्यांना सहकार्य, परिस्थिती शांत होईल अशी आशा करतो; बीबीसीची पहिली प्रतिक्रीया

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी