29 C
Mumbai
Monday, September 23, 2024
Homeमहाराष्ट्रउद्योग मंत्री सुभाष देसाईंची मोठी कामगिरी, अमेरिकन कंपनी राज्यात गुंतवणार २ हजार...

उद्योग मंत्री सुभाष देसाईंची मोठी कामगिरी, अमेरिकन कंपनी राज्यात गुंतवणार २ हजार कोटी

टीम लय भारी

मुंबई :- महाराष्ट्र राज्यात कोरोनामुळे अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत तर काही लोकांचे व्यवसाय देखील बंद पडले आहेत. त्यामुळेच महाराष्ट्र राज्यात बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अशात अमेरिकेन कंपनीने (American company) महाराष्ट्रात सुमारे दोन हजार कोटी गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे.

पुणे जिल्ह्यातील रांजणगाव किंवा तळेगावमध्ये कंपनी (Company) आपल्या प्रकल्पाचा विस्तार करणार आहे. त्यामुळे तेथील आजूबाजूच्या भागातील लोकांना रोजगारांच्या संधी देखील निर्माण होणार आहेत. या कंपनीमुळे सुमारे १३ हजार प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत.

संजय राऊतांच्या वक्तव्यांवर बाळासाहेब थोरांताची प्रतिक्रिया

पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीवरून राहुल गांधींनी मोदी सरकारला लगावला खोचक टोला

West Bengal post-poll violence: SC Judge Indira Banerjee recuses herself from hearing

याच संदर्भात आज उद्योगमंत्री सुभाष देसाई (Industry Minister Subhash Desai)  यांच्यासोबत कंपनीच्या प्रतिनिधींनी वेबिनारद्वारे चर्चा केली. या वेळी जेबिल कंपनीचे भारतातील प्रमुख डॅन वँग, डेसमाँड चेंग, सुधीर बालकृष्णन, व्हिक्टर मोनोरॉय, सुधीर साहू, पॅक्ट्रीक कॉनली यांच्यासह उद्योग विभागाचे सचिव बलदेव सिंग, एमआयडीसी सीईओ डॉ. पी. अन्बलगन आदी यावेळी उपस्थित होते.

इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्मितीत जेबिल कंपनी आघाडीवर आहे. महाराष्ट्रात स्मार्ट फोन, मोबाईलचे सुटे भाग, स्मार्ट गृहपयोगी वस्तू, अन्न व खाद्यपदार्थाचे वेष्ठन निर्मित आदी क्षेत्रात आपल्या प्रकल्पाचा विस्तार करणार आहे. याद्वारे सुमारे दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. यातून सुमारे १३ हजार प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहे. पुणे जिल्ह्यातील रांजणगाव किंवा तळेगावमध्ये प्रकल्प सुरू करण्याच मानस कंपनीच्या (Company) प्रतिनिधींनी व्यक्त केला.

जेबिल कंपनीने महाराष्ट्रात गुंतवणूक व विस्तार करण्याची तयारी दर्शवली आहे, त्यांच्या प्रस्तावित प्रकल्पासाठी उद्योग विभागाच्यावतीने सर्व सहकार्य केले जाईल. या प्रकल्पामुळे गुंतवणुकवाढीला हातभार लागले. शिवाय मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल. कंपनीला (Company) रेडीशेड, जमीन व इतर सुविधी प्राधान्यांने दिल्या जातील असे सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी स्पष्ट केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी