29 C
Mumbai
Saturday, May 11, 2024
Homeमहाराष्ट्रTension : खडसे म्हणाले, 'भाजपात कधी काय चौकशी लागेल, याची भीती होती,...

Tension : खडसे म्हणाले, ‘भाजपात कधी काय चौकशी लागेल, याची भीती होती, आता मी टेन्शन फ्री’

टीम लय भारी

नाशिक : भाजपात कधी काय चौकशी लागेल, याची भीती होती, आता राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर मी टेन्शन फ्री (Tension Free) झालो आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्याने दाखल झालेले नेते एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. नाशिक दौ-यावर असताना माध्यमांशी संवाद साधताना खडसे यांनी हे विधान केले आहे.

भाजपमध्ये ‘यूज अ‍ॅन्ड थ्रो’ची पद्धत

भाजपमध्ये ‘यूज अ‍ॅन्ड थ्रो’ची पद्धत आहे, अशी टीका देखील खडसे यांनी केली आहे.

फडणवीस कोरोनातून लवकर बरे व्हावेत

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली असल्याच्या वृत्तावरही एकनाथ खडसे यांनी भाष्य केले आहे. फडणवीस कोरोनातून लवकर बरे व्हावेत. त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा असल्याचे खडसेंनी यावेळी सांगितले.

अजितदादा, आव्हाडांच्या नाराजीच्या बातम्यांमुळे शरद पवार आणि माझी मोठी करमणूक

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नाराजीच्या वृत्तावर एकनाथ खडसे यांनी भाष्य केले आहे. अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्या नाराजीच्या बातम्या बघून माझी आणि शरद पवारांची खूप करमणूक झाली, असे खडसे यांनी सांगितले.

12 ते 15 माजी आमदार माझ्या संपर्कात

भाजपाला सोडचिठ्ठी देऊन ज्येष्ठ नेते खडसेंनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश म्हणजे भाजपाला मोठा धक्का बसल्याचे सांगण्यात येत आहे. 12 ते 15 माजी आमदार माझ्या संपर्कात आहेत आणि ते लवकरच राष्ट्रवादीत येतील, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे.

एकनाथ खडसे यांच्या या दाव्यानंतर नेमके कोणते माजी आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी